Join us

कडेकोट पोलिस बंदोबस्त; कावड यात्रा शांततेत

By admin | Updated: August 25, 2014 21:40 IST

अकोला - राजराजेश्वराला जलाभिषेक करण्यासाठी वाघोली येथून जल आणण्यासाठी रविवारी रात्रीच गेलेले हजारो शिवभक्त सोमवारी पहाटे पासूनच शहरात दाखल झाले. हजारो शिवभक्त खांद्यावर कावड घेऊन सोमवारी शहरामध्ये दाखल झाले. या कावड यात्रेदरम्यान जिल्हा पोलिस प्रशासनाने तगडा पोलिस बंदोबस्त तैनात केल्यामुळे कुठलाही वाद न होता कावड यात्रा महोत्सव शांततेत पार पडला. ८०० च्यावर पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांच्या बंदोबस्तात यात्रा शांततेत पार पडली.

धार्मिक सण व उत्सवाच्या काळात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी राज्य राखीव पोलिस दलाच्या जवानांची एक तुकडीही कावड यात्रा मार्गावर तैनात करण्यात आली होती. शहराच्या संवेदनशील भागात ठिकठिकाणी सुरक्षा कठडे उभारण्यात आले होते. वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांची गस्तही कावड यात्रा मार्गावर सतत सुरू होती. कावड यात्रा मार्गावरील तीनही पोलिस ठाण्याच्या हद्दीत १२ च्यावर ठिकाणांवर फिक्स पॉइंट लावण्यात आले होते. जिल्हा पोलिस अधीक्षक चंद्रकिशोर मिणा, अतिरिक्त पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांच्यासह १० पोलिस निरीक्षक, २८ पोलिस उपनिरीक्षक, ५३० पोलिस कर्मचारी, ५५ महिला पोलिस कर्मचारी, २०० होमगार्ड व ४८ महिला होमगार्डसह राज्य राखीव दलाच्या जवानांनी कडक बंदोबस्त ठेवला.
फोटो -पोलिसांचा घेणे