Join us
Daily Top 2Weekly Top 5

उपायुक्तांच्या विरोधातील सभा टायटाय -जोड बातमी

By admin | Updated: December 2, 2014 23:30 IST

बॉक्स....

बॉक्स....
सर्व काही रात्री शिजले!
भाजप नेते व पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत क ाही मनपा अधिकार्‍यांची सोमवारी रात्री गुप्त ठिकाणी प्रदीर्घ चर्चा झाली. अधिकार्‍यांनी मनमानीला आवर घालण्याचे आश्वासन दिल्यास विशेष सभा स्थगित करण्यावर एकमत झाले. त्यावर मनपाच्या कामाकाजात सुधारणा करीत समस्या निकाली काढण्यासाठी काही दिवसांचा अवधी देण्यात यावा, अशी विनंती मनपा अधिकार्‍यांनी केल्याची माहिती आहे.

कोट...
आमचा विकासकामांना विरोध नाही; परंतु मूलभूत सुविधा ठप्प पडल्या असताना, त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहेत. उपायुक्तांना कामकाजात सुधारणा करण्यासाठी एक संधी बहाल करण्यात आली आहे.
- उज्ज्वला देशमुख महापौर

कोट...
मागील आठ महिन्यांमध्ये मनपाच्या उत्पन्नात वाढ झाली नसून, कर्मचार्‍यांचे वेतन थकीत आहे. पथदिवे, पाणीपुरवठा, लिकेज, साफसफाईचा प्रश्न गंभीर झाला आहे. प्रशासनाने मूलभूत सुविधा द्याव्यात. तसे होत नसल्याची स्थिती आहे. मनपात पदाधिकारीच बदनाम ठरतात. तत्कालीन आयुक्त डॉ. विपीनकुमार शर्मा असताना, या बाबीचा काँग्रेसला चांगला अनुभव आहे. काँग्रेसचा अनुभव लक्षात घेऊनच आम्ही उपायुक्तांना कामकाजात सुधारणा करण्यासाठी एक संधी दिली. आम्ही सकारात्मक असल्याने एक पाऊल मागे घेण्यास हरकत नसावी.
-विजय अग्रवाल, माजी सभापती व विद्यमान नगरसेवक

कोट...
उपायुक्तांच्या मुद्द्यावर भाजपमध्येच दुफळी आहे. सभा स्थगित करण्याचे कोणतेही कारण भाजपने दिले नाही. सत्तापक्षाचे आयुक्त, उपायुक्तांसोबत साटंलोटं आहे. दबावाच्या राजकारणातून सभा आयोजित करण्यात आली. भाजपचा आर्थिक उद्देश सफल झाला असावा.
- साजिद खान, विरोधी पक्षनेता, मनपा

कोट...
उपायुक्तांवर निलंबनाच्या कारवाईसाठी विशेष सभा कोणत्या नियमांतर्गत आयोजित केली, याबाबत सत्ताधार्‍यांमध्ये संभ्रम आहे. हा केवळ अधिकार्‍यांवर दबावतंत्राचा भाग आहे. दबाव आणून काही खासगी कामे करण्याचा भाजपचा डाव दिसतो. या प्रकारामुळे शहरात भाजपची नाचक्की झाली आहे.
-मदन भरगड, माजी महापौर तथा विद्यमान नगरसेवक

कोट...
महापौरांनी सकाळी आयोजित केलेल्या सभेमध्येच उपायुक्तांसाठी आयोजित केलेली विशेष सभा स्थगित केली. नियमानुसार सभेच्या कामाला सुरुवात करूनच सभा स्थगित करता येते. भाजपचा हेतू स्वच्छ नव्हता,असे दिसून येते.
-सुनील मेश्राम, ज्येष्ठ नगरसेवक