मुंबई : अमेरिकेच्या आर्थिक वृद्धीची समाधानकारक आकडेवारी जाहीर होताच त्याचा सकारात्मक परिणाम बुधवारी शेअर बाजारावर दिसून आला. सेन्सेक्सने २६० अंकांची उसळी घेत २५,८५०.३० असा तीन आठवड्यांतील उच्चांक स्थापन केला.बीएसईप्रमाणेच निफ्टीनेही ८९.८५ अंकांनी उसळी घेत ७,८०० चा टप्पा पार केला. ३० शेअरचा सेन्सेक्स १.०१ टक्क्याने म्हणजे २५९.६५ अंकांनी उसळी घेत २५,८५०.३० वर बंद झाला. निफ्टी ७,८६५.९५ वर बंद झाला.चालू खात्यातील तूट सप्टेंबरमध्ये घटून ८.२ अब्ज डॉलर झाली. त्यामुळे गुंतवणूकदारांचा उत्साह वाढला. त्यामुळे शेअर बाजारात उत्साह होता.बीएनपी परिबा एमएफचे फंड मॅनेजर (इक्विटी) श्रेयश देवळकर म्हणाले की, अमेरिकेची अर्थव्यवस्था सुधारत चालल्याचे संकेत आहेत. त्यातच शेअर बाजारात आठवडाअखेर असल्याने परदेशी गुंतवणूकदारांवर विक्रीचे दडपण नव्हते. त्याचा जबरदस्त परिणाम शेअर बाजारावर झाला.धातू, तेल आणि वायू, हेल्थ केअर, ऊर्जा आणि रिअॅलिटी क्षेत्र यांच्या शेअरना चांगली मागणी होती. चालू महिन्यात विदेशी निधीचा ओघही चांगला होता. सलग सातव्या दिवशी रुपया वधारला. त्यामुळे शेअर बाजारात चांगले वातावरण होते, असे ब्रोकर्सनी सांगितले.सर्वाधिक वृद्धी टाटा स्टीलची २.५३ टक्क्यांनी झाली. युरोपात उत्पादनांच्या विक्रीबाबत टाटा स्टील युकेने ग्रेबल कॅपिटलशी करार केला आहे. त्याचा फायदा टाटा स्टीलला झाला.> युरोपीय आणि अमेरिकी मार्केटमध्ये चांगले वातावरण होते. त्याचा अनुकूल परिणाम आशियाई बाजारावर झाला.सेन्सेक्समधील ३० पैकी २५ कंपन्यांचे शेअर्स नफ्यात होते. पाच कंपन्यांचे शेअर्स मात्र तोट्यात होते.हाँगकाँग, सिंगापूर, दक्षिण कोरिया आणि तैवान येथील मार्केट ०.९६ टक्क्याने वधारले, तर चीनचे शांघाय कंपोझिट ०.४३ टक्क्याने घसरले. युरोपात प्रारंभी उत्साह होता. शुक्रवारी नाताळनिमित्त बाजार बंद राहणार आहे. जपानमध्ये राष्ट्रीय सुटी असल्याने बुधवारी बाजार बंद होता.
सेन्सेक्सचा तीन आठवड्यांतील उच्चांक
By admin | Updated: December 24, 2015 00:24 IST