जि़प़च्या तीन अधिकार्यांना बढती
By admin | Updated: August 25, 2014 21:40 IST
पंढरपूरच्या बीडीओची बदली
जि़प़च्या तीन अधिकार्यांना बढती
पंढरपूरच्या बीडीओची बदलीसोलापूर: जिल्हा परिषदेच्या तीन अधिकार्यांना शासनाने पदोन्नती देऊन बदली केली आहे तर पंढरपूरच्या गटविकास अधिकार्यांची बदली करण्यात आली आहे; मात्र पंढरपूरचे पद रिक्त ठेवण्यात आले आह़े विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदल्या करण्यात आल्या आहेत़ महाराष्ट्र विकास सेवा गट ‘अ’ मधील अधिकार्यांच्या सुमारे 17 अधिकार्यांच्या बदल्यांचा आदेश ग्रामविकास खात्याने 25 ऑगस्ट रोजी काढला आह़े जिल्हा परिषदेत कक्ष अधिकारी म्हणून कार्यरत असणार्या नंदा रकटे यांची सहायक गटविकास अधिकारी पंचायत समिती करमाळा येथे पदोन्नतीवर बदली करण्यात आली आह़े त्याचप्रमाणे सहायक पशुधन अधिकारी पोपट शेंडगे यांची सहायक गटविकास अधिकारी पंचायत समिती पंढरपूर येथे बढतीवर बदली केली आह़े जिल्हा परिषद विस्तार अधिकारी पंचायत या पदावर कार्यरत असणार्या शिवाजी पाटील यांची बार्शी पंचायत समितीमध्ये सहायक गटविकास अधिकारी पदावर पदोन्नतीद्वारे बदली केली आह़ेपंढरपूर पंचायत समिती येथील गटविकास अधिकारी आऱ डी़ शेळकंदे यांची त्याच पदावर राहुरी पंचायत समितीमध्ये बदली करण्यात आली आहे. त्यामुळे पंढरपूरचे पद रिक्त राहिले आह़े