Join us
Daily Top 2Weekly Top 5

तीन सरकारी बँकांच्या प्रमुखपदांसाठी ३ नावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 03:56 IST

बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक आणि बँक ऑफ इंडिया यांच्या व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारीपदासाठी संजीव चढा, एल.व्ही. प्रभाकर आणि अतानुकुमार दास यांच्या नावांची शिफारस बँक बोर्ड ब्युरोने (बीबीबी) केली आहे.

नवी दिल्ली : बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक आणि बँक ऑफ इंडिया यांच्या व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारीपदासाठी संजीव चढा, एल.व्ही. प्रभाकर आणि अतानुकुमार दास यांच्या नावांची शिफारस बँक बोर्ड ब्युरोने (बीबीबी) केली आहे.या पदांसाठी बीबीबीने मंगळवारी मुलाखती घेतल्या होत्या. त्याआधारे ही निवड करण्यात आल्याचे बीबीबीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. याशिवाय बँक आॅफ महाराष्ट्राचे एमडी व सीईओ ए. एस. राजीव आणि करूर वैश्य बँकेचे एमडी व सीईओ पी. आर. शेषाद्री यांना राखीव यादीत ठेवण्यात आले आहे.