Join us
Daily Top 2Weekly Top 5

सोन्याचा तीन महिन्यांचा नीचांक

By admin | Updated: June 4, 2016 02:44 IST

भावात आणखी घसरण झाल्यानंतर शुक्रवारी सोने ३ महिन्यांच्या नीचांकावर गेले. चांदीच्या भावात मात्र सुधारणा झाली आहे

नवी दिल्ली : भावात आणखी घसरण झाल्यानंतर शुक्रवारी सोने ३ महिन्यांच्या नीचांकावर गेले. चांदीच्या भावात मात्र सुधारणा झाली आहे. जागतिक बाजारातही सोने घसरले. न्यू यॉर्क बाजारात काल सोने 0.१९ टक्क्याने घसरून १,२१0.४0 डॉलर प्रति औंस झाले. राजधानी दिल्लीत ९९.९ टक्के आणि ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी १४५ रुपयांनी वाढून अनुक्रमे २८,७२0 रुपये आणि २८,५७0 रुपये प्रति १0 ग्रॅम झाला. १८ फेब्रुवारी रोजी सोने या पातळीवर होते.