Join us

सप्टेंबरमध्ये बाजारात येणार तीन आयपीओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2016 01:06 IST

आयसीआयसीआय प्रूडेंशियल लाइफ इन्शोरन्स कंपनी, एलअँडटी टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस आणि जीएनए एक्सल्स या तीन कंपन्या या महिन्याच्या सुरुवातीस आयपीओच्या माध्यमातून ७००० कोटी रुपये उभे करणार आहेत

नवी दिल्ली : आयसीआयसीआय प्रूडेंशियल लाइफ इन्शोरन्स कंपनी, एलअँडटी टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस आणि जीएनए एक्सल्स या तीन कंपन्या या महिन्याच्या सुरुवातीस आयपीओच्या माध्यमातून ७००० कोटी रुपये उभे करणार आहेत. एलअँडटी टेक्नॉलॉजी सर्व्हिसेसच्या शेअर्ससाठी सोमवारी बोली सुरू होईल, तर जीएनए एक्सल्सचा १४ रोजी व आयसीआयसीआयचा आयपीओ १९ रोजी खुला होईल. आयसीआयसीआय प्रूडेंशियल लाइफ इन्शोरन्स कंपनी ६,०५७ कोटी रुपये, एलअँडटी ८९४ कोटीे, तर जीएनए एक्सल्स १३० कोटी उभारणार आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)