अल्पवयीन मुलींच्या छेडछाड प्रकरणी तिघे गजाआड
By admin | Updated: August 21, 2014 21:45 IST
ठाणे - शाळेतून पायी जाणार्या दोन अल्पवयीन शाळकरी मुलींची छेडछाड काढणार्या मंगेश पाटील, परेश पाटील आणि बी.जी. जोशी या तिघांना कासारवडवली पोलिसांनी गुरुवारी अटक केली. हे त्रिकूट मागील आठ दिवसांपासून त्या मुलींची मोटारसायकलवरून येऊन भररस्त्यात छेड काढत असे. याबाबत, मुलींनी आपल्या पालकांना सांगितले होते. गुरुवारीही तसा प्रकार त्यांच्या पालकांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी त्रिकुटाला विचारणा केली. तसेच पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यानंतर, त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केल्याची माहिती कासारवडवली पोलिसांनी दिली.
अल्पवयीन मुलींच्या छेडछाड प्रकरणी तिघे गजाआड
ठाणे - शाळेतून पायी जाणार्या दोन अल्पवयीन शाळकरी मुलींची छेडछाड काढणार्या मंगेश पाटील, परेश पाटील आणि बी.जी. जोशी या तिघांना कासारवडवली पोलिसांनी गुरुवारी अटक केली. हे त्रिकूट मागील आठ दिवसांपासून त्या मुलींची मोटारसायकलवरून येऊन भररस्त्यात छेड काढत असे. याबाबत, मुलींनी आपल्या पालकांना सांगितले होते. गुरुवारीही तसा प्रकार त्यांच्या पालकांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी त्रिकुटाला विचारणा केली. तसेच पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यानंतर, त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केल्याची माहिती कासारवडवली पोलिसांनी दिली. ...........(प्रतिनिधी)वाचली - नारायण जाधव