Join us  

दिलासा मिळणार! यंदाही व्याजदर वाढीला ब्रेकच; महागाई घटल्यामुळे RBI दर स्थिर ठेवण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2023 10:14 AM

बॅंकिंग क्षेत्राची अपेक्षा काय?

लाेकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : महागाईत घट झाल्यामुळे गेल्यावेळी आरबीआयने व्याजदर वाढीला ब्रेक लावला हाेता. आगामी बैठकीतही आरबीआय व्याजदर वाढ न करण्यासाेबतच रेपाे रेटही स्थिर ठेवण्याचा निर्णय घेउन नागरिकांना दिलासा देउ शकते. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखालील पतधाेरण समितीची बैठक ६ ते ८ जून या कालावधीत हाेणार आहे. या बैठकीच्या निर्णयांची घाेषणा ८ तारखेला हाेईल. यावेळीही आरबीआय व्याजदरवाढ करणार नाही, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तविला आहे. 

बॅंकांमध्ये जमा झाला प्रचंड पैसा

आरबीआयने व्याजदर वाढविल्यानंतर बॅंकांनीही ठेवींवरील व्याजदर वाढविले आहेत. परतावा जास्त मिळत असल्यामुळे याचा लाेकांनी पुरेपूर फायदा घेला असून माेठ्या प्रमाणावर पैसे ठेवींमध्ये गुंतविले आहेत. तब्बल ८.४३ लाख काेटी रुपये प्रमुख ५ सरकारी बॅंकांमध्ये गेल्या आर्थिक वर्षात जमा झाले. ६.६० लाख काेटी रुपये प्रमुख ५ खासगी बॅंकांमध्ये जमा झाले.

बॅंकिंग क्षेत्राची अपेक्षा काय?

आरबीआयने गेल्या वर्षभरात २.५ टक्के व्याजदर वाढविला आहे. बॅंकिंग क्षेत्राचा विचार केल्यास व्याजदर आधीच खूप वाढलेले आहेत. त्यामुळे पुन्हा दरवाढीची अपेक्षा या क्षेत्राला नाही. आरबीआय वाट पाहा आणि लक्ष ठेवा या धाेरणावर कायम राहण्याची शक्यता आहे.

मान्सूनवर नजर

- तज्ज्ञांच्या मते, पतधाेरण समितीच्या बैठकीत विविध मुद्दे चर्चेला येतील. आरबीआयची मान्सूनवरही नजर राहणार आहे. 

- यावर्षी अल नीनाेचा प्रभाव राहणार आहे. त्याचा खरीप पिकांवर दुष्परिणाम हाेण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसे झाल्यास धान्याच्या किंमती वाढण्याची भीती आहे.

४.७ टक्के महागाईचा दर

- एप्रिलमध्ये महागाईचा दर १८ महिन्यांच्या ४.७ या निचांकी पातळीवर आला हाेता. त्यानंतर पतधाेरण समितीची बैठक हाेत आहे. 

- मे महिन्यात महागाईचा दर आणखी कमी हाेण्याचा अंदाज आहे. त्यामुळे व्याजदर वाढ टळण्याचीच शक्यता जास्त आहे.

 

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँकमहागाई