तूर डाळीच्या साठ्यांवर पुन्हा धाडी - ४२१ क्विंटल तूर व ४५०० क्विंटल चणा साठा जप्त
By admin | Updated: April 26, 2016 01:59 IST
नागपूर : बाजारात तूर डाळीच्या वाढत्या किमतीवर नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी मौजा तीरखुडा (ता. उमरेड) येथील अग्रवाल वेअर हाऊसवर सोमवारी टाकलेल्या धाडीत ४२१ क्विंटल तुरीचा साठा व ४५०० क्विंटल चणा जप्त केला.
तूर डाळीच्या साठ्यांवर पुन्हा धाडी - ४२१ क्विंटल तूर व ४५०० क्विंटल चणा साठा जप्त
नागपूर : बाजारात तूर डाळीच्या वाढत्या किमतीवर नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी मौजा तीरखुडा (ता. उमरेड) येथील अग्रवाल वेअर हाऊसवर सोमवारी टाकलेल्या धाडीत ४२१ क्विंटल तुरीचा साठा व ४५०० क्विंटल चणा जप्त केला.अग्रवाल वेअर हाऊस या नावाने अन्नधान्य साठवणुकीचे गोदाम आहे. या ठिकाणी दिलीप रहाटे, रा. इतवारी पेठ उमरेड यांनी तूर डाळ आणि चण्याचा साठा अनधिकृतरीत्या केला होता. जप्त साठ्याची अंदाजे किंमत २ कोटी ६९ लाख ७८ हजार ५०० रुपये आहे. ही कारवाई जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पुरवठा अधिकारी नरेश वंजारी, तहसीलदार चंद्रभान खंडाईत, प्रशांत शेंडे, पी.जी. निखारे यांनी केली.