Join us

तिसऱ्या दिवशीही सेन्सेक्सची आपटी

By admin | Updated: January 6, 2016 23:34 IST

विदेशी गुंतवणूकदारांनी भांडवल काढून घेण्याचे सत्र आणि जागतिक बाजारातील मंदी यामुळे सलग तिसऱ्या दिवशी भारतीय शेअर बाजारात सेन्सेक्सची १७४ अंकांनी घसरण होऊन

मुंबई : विदेशी गुंतवणूकदारांनी भांडवल काढून घेण्याचे सत्र आणि जागतिक बाजारातील मंदी यामुळे सलग तिसऱ्या दिवशी भारतीय शेअर बाजारात सेन्सेक्सची १७४ अंकांनी घसरण होऊन २५,४०६.३३ या तीन आठवड्यांतील नीचांकी स्तरावर आला.सेन्सेक्सप्रमाणेच निफ्टीही दबावाखाली येऊन ०.५६ टक्क्यांनी म्हणजे ४३.६५ अंकांनी घसरून ७,७४१.०० वर बंद झाला.सेन्सेक्सची २५,६२८.२३ अंकाने सुरुवात झाली. एकवेळ तो २५,६३२.५७ या सर्वोच्च स्तरावर पोहोचला. विशेषत: रिलायन्स आणि अन्य काही ब्लू चीप शेअर्सला मिळालेल्या प्रतिसादाने बाजार वधारला होता; पण त्यानंतर सेन्सेक्समध्ये घसरण होऊन तो एकवेळ २५,३५७.७० वर गेला. शेवटी १७४.०१ अंकांनी घसरण होऊन २५,४०६.३३ वर बाजार बंद झाला. यापूर्वी १५ डिसेंबर रोजी २५,३२०.४४ अंकावर बाजार बंद झाला होता. त्यानंतरचा हा नीचांकी स्तर आहे.बीएसईतील एफएमसीजी क्षेत्रातील शेअर्स १.५७ टक्के, धातू १.४८ टक्के, भांडवली सामान १.३२ टक्के, आॅटो १.२४ टक्के, रियल्टी ०.८५ आणि बँकिंग ०.८१ टक्क्यांनी घसरले.आशियात चीन वगळता अन्य बाजारात घसरण झाली. दोन दिवसांच्या घसरणीनंतर चीनचा बाजार सावरला. युरोपातही प्रारंभी घसरण झाली.