नवी दिल्ली : लग्नसराईच्या खरेदीने सलग तिसऱ्या दिवशी गुरुवारी राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात तेजीचा कल नोंदला गेला. आज सोन्याचा भाव ५५ रुपयांनी वधारून तीन महिन्यांचा उच्चांक २७,४७५ रुपये प्रति १० ग्र्रॅम झाला. लग्नसराईच्या खरेदीने बाजारात ही तेजी दिसून आली. चांदीचा भाव २०० रुपयांनी कोसळून ३७,४०० रुपये प्रतिकिलो झाला. सध्या लग्नसराई सुरू असून जोरदार खरेदी सुरू आहे. दुसरीकडे जागतिक बाजारातील तेजीचेही यास बळ मिळाले. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया घसरल्याने आयात महागली. त्यामुळे गुंतवणूकदारांनी सराफ्यात योगदान दिले. लंडन येथे सोन्याचा भाव ०.१७ टक्क्यांनी उंचावून १,२०६.६० डॉलर प्रतिऔंस आणि चांदी ०.५७ टक्क्यांनी वधारून १६.६३ डॉलर प्रतिऔंस राहिला. दुसरीकडे तयार चांदीचा भाव मर्यादित व्यवहारामुळे २०० रुपयांनी कोसळून ३७,४०० रुपये, तर चांदी साप्ताहिक डिलिव्हरीचा भाव १७० रुपयांनी वाढून ३७,४६० रुपये प्रतिकिलो झाला. चांदीच्या शिक्क्यांचा भाव खरेदीकरता ५६,००० रुपये आणि ५७,००० रुपये प्रतिशेकडा राहिला. ४राजधानी दिल्लीत ९९.९ आणि ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी ५५ रुपयांनी वधारून अनुक्रमे २७,४७५ रुपये आणि २७,३२५ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. ४यात गेल्या दोन सत्रांत ३७० रुपयांची वाढ झाली होती. तथापि आठ ग्रॅम गिन्नीचा भाव २३,७०० रुपयांवर कायम राहिला.
लग्नसराईमुळे सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या भावात तेजी
By admin | Updated: May 1, 2015 01:40 IST