Join us  

बँकांनी व्याजदर कमी न करताही आपला EMI होऊ शकतो कमी; जाणून घ्या 'ट्रिक'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2019 1:23 PM

बँकांकडून कर्जदारांना रेपो रेट कपातीचा मोठ्या प्रमाणात फायदा होत नसल्याचे दिसून येत आहे.

नवी दिल्ली - रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकांचे व्याजदर कमी करण्याचे संकेत दिले आहेत. रिझर्व्ह बँकेने रेपो रेट कमी केल्यानंतरही बँकाकडून सध्या व्याज दरांमध्ये अतिशय कमी प्रमाणात कपात करण्यात आली आहे. आरबीआयने रेपो रेटमध्ये दोनवेळा 0.25 टक्क्यांनी कपात केली आहे. मात्र, तरीही अनेक बँकांनी आपल्या व्याजदरात केवळ 0.10 टक्क्यांनीच घट केली आहे. त्यामुळे थोड्या प्रमाणात तुमचा ईएमआय कमी होण्यीच शक्यता आहे.  

बँकांकडून कर्जदारांना रेपो रेट कपातीचा मोठ्या प्रमाणात फायदा होत नसल्याचे दिसून येत आहे. याबाबत, इंस्टीट्युट ऑफ मॅनजमेंट टेक्नॉलॉजी, नागपूरचे प्राध्यापक डीएन. पाणिग्रही यांनी म्हटले की, बँकांच्या निधीच्या रकमेचा रेपो रेटशी काहीही संबंध नाही. जेव्हा बँकेकडे रोख रकमेची कमतरता जाणवते, तेव्हाच बँक रेपो दराच्या सुविधांचा वापर करते. त्यामुळे रेपो रेट कमी झाल्याने त्यांच्या फंडिंगमध्ये काहीही फरक पडत नाही. 

देशातील मोठ्या बँकांच्या डिपॉझिटमध्ये 30 ते 40 टक्के भागदारी असणाऱ्या करंट आणि सेव्हींग खात्यावरील व्याजदरात कुठलाही बदल झालेला नाही. तसेच, आरबीआयच्या व्याजदरात कपात झाल्यास, लहान-सहान बचत खात्यांच्या योजनांवरील गुंतवणुकीच्या व्याजदरात कपात होत नाही. देशातील बँकांचे कर्ज आणि डिपॉझिट यामध्ये मिसमॅच असल्याचेही पाणिग्रही यांनी म्हटले आहे. कर्जाचा मोठा भाग हा फ्लोटींग रेट आहे, पण फ्लोटींग रेट भारतासारख्या डिपॉझिट देशात लोकप्रिय नाही. डिपॉझिटवरील व्याजदरात एका निश्चित काळानंतरच बदल केला जाऊ शकतो. त्यामुळे डिपॉझिट रेटमध्ये कपात झाल्यानंतरही बँकांच्या निधीची रक्कम कमी होणार नाही.  

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँकबँकबँक ऑफ इंडिया