Join us  

यंदा अर्थसंकल्पाची छपाई नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2021 2:22 AM

इतिहासात पहिल्यांदाच अर्थसंकल्प छपाई नाही

ठळक मुद्दे‘नाॅर्थ ब्लाॅक’मध्ये अर्थसंकल्पाची कागदपत्रे छापण्यासाठी स्वतंत्र छापखाना आहे. अर्थसंकल्पाच्या प्रति छापल्यानंतर त्या सीलबंद करून वितरण हाेईपर्यंत संबंधित १००हून अधिक कर्मचारी आणि अधिकारी याच ठिकाणी राहतात,

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थसंकल्पाच्या काउंटडाउनला सुरुवात झाली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि त्यांच्या टीमसाठी यंदाचा अर्थसंकल्प खूप आव्हानात्मक राहणार आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात एक गाेष्ट मात्र काही प्रथा आणि पायंडा माेडणारी राहणार आहे. यावेळी अर्थसंकल्पाच्या प्रति छापण्यात येणार नसून, पारंपरिक हलवा बनविण्याचा कार्यक्रमही रद्द करण्यात आला आहे. 

‘नाॅर्थ ब्लाॅक’मध्ये अर्थसंकल्पाची कागदपत्रे छापण्यासाठी स्वतंत्र छापखाना आहे. अर्थसंकल्पाच्या प्रति छापल्यानंतर त्या सीलबंद करून वितरण हाेईपर्यंत संबंधित १००हून अधिक कर्मचारी आणि अधिकारी याच ठिकाणी राहतात, तसेच छपाई झाल्यानंतर सर्वांसाठी हलवा बनविण्याची परंपराही माेडीत काढण्यात आली आहे. 

डिजिटल अर्थसंकल्पस्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प २६ नाेव्हेंबर, १९४७ सादर झाला हाेता. त्यावेळीही छपाई झाली नव्हती. त्यानंतर, आता प्रथमच छपाई हाेणार नाही. संसदेच्या सर्व सदस्यांना आर्थिक सर्वेक्षण आणि अर्थसंकल्पाच्या डिजिटल प्रति देण्यात येणार आहेत.

टॅग्स :अर्थव्यवस्थाअर्थसंकल्प