Join us

जीएसटीमुळे नोकरीत कपात नाही

By admin | Updated: October 17, 2016 05:12 IST

जीएसटीमुळे केंद्रीय उत्पादन आणि सीमा शुल्क बोर्डाच्या (सीबीईसी) अंतर्गत येणाऱ्या नोकऱ्यांची कपात होणार नाही

नवी दिल्ली : जीएसटीमुळे केंद्रीय उत्पादन आणि सीमा शुल्क बोर्डाच्या (सीबीईसी) अंतर्गत येणाऱ्या नोकऱ्यांची कपात होणार नाही, असे आश्वासन अर्थ मंत्रालयाने या अधिकाऱ्यांना दिले. अप्रत्यक्ष कर विभागात यामुळे कोणतीही कपात होणार नाही; तसेच धोरण ठरविण्यात येईल, असे या अधिकाऱ्यांना सांगण्यात आले. गत आठवड्यात झालेल्या बैठकीत केंद्रीय उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी कपातीबाबतची चिंता व्यक्त केली होती. आॅल इंडिया असोसिएशन आॅफ सेंट्रल एक्साइज आॅफिसर्सचे महासचिव रवी मलिक यांनी सांगितले की, आमच्या शंका आम्ही सरकारकडे व्यक्त केल्या आहेत. याबाबत आम्हाला ठोस आश्वासन देण्यात आले आहे. संघटनेने याबाबत १४ आॅक्टोबर रोजी धरणे आंदोलन करण्याचे ठरविले होते. पण, या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. (लोकमत न्यूज नेटवर्क)