Join us

रिझर्व्ह बँकेकडून व्याज दरात कोणताही बदल नाही

By admin | Updated: December 1, 2015 12:02 IST

रिझर्व्ह बँकेने चालू आर्थिक वर्षातील पाचवे पतधोरण जाहीर केले असून व्याज दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १ - भारतीय  रिझर्व्ह बँकेने चालू आर्थिक वर्षातील पाचवे पतधोरण जाहीर केले असून व्याजदरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. रेपो रेट ६.७५ टक्के  तर सीआरआर ( रोख राखीव प्रमाण) ४ टक्क्यांवर स्थिर ठेवण्यात आला आहे. 
गेल्या पतधोरणावेळी रेपो दरात अर्धा टक्के दर कपात केली होती, त्यामुळे आज सादर होणाऱ्या पतधोरणामध्ये व्याजदर जैसे थेच राहणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत होते, त्यानुसार व्याजदरात कोणताही बदल झालेला नाही.