Join us  

बहिष्काराचा परिणाम! मालदीवला दररोज ८.६४ कोटी रुपयांचे नुकसान होतंय

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2024 4:42 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसापूर्वी लक्षद्वीपला भेट दिली. यावेळी त्यांनी समुद्रकिनारी फेटफटका मारल्याचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसापूर्वी लक्षद्वीपला भेट दिली. यावेळी त्यांनी समुद्रकिनारी फेटफटका मारल्याचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले. यावेळी मालदीवच्या मंत्र्यांनी काही आक्षेपार्ह पोस्ट केली. यावर नेटकऱ्यांनी बॉयकॉट मालदीव ट्रेंड सुरू केला, याचा मालदीवला मोठा फटका बसला आहे. भारताच्या बहिष्कारामुळे मालदीवचे दररोज करोडो रुपयांचे नुकसान होत आहे. ज्या देशाचा फक्त महसूल पर्यटक आणि पर्यटनातूनच येतो, त्या देशाची अवस्था बिकट होते हे उघड आहे. परिस्थिती हाताळण्यासाठी मालदीवने तेथील प्रवासाचा खर्च निम्म्यावर आणला आहे, तरीही भारतीय तेथे जाण्यास तयार नाहीत.

रेखा झुनझुनवाला यांच्या आवडत्या स्टॉकवर गुंतवणूकदारांच्या उड्या, कंपनीचा आहे जबरदस्त प्लॅन

या संपूर्ण वादापूर्वी मालदीव हे भारतीयांचे आवडते पर्यटन स्थळ होते. दरवर्षी लाखो भारतीय तिथे भेट देत होते. पण भारतीयांनी बहिष्कार टाकल्याने खुद्द मालदीवनेच आपली ४४ हजार कुटुंबे आता अडचणीत आल्याचे म्हटले आहे. भारतीयांच्या नाराजीमुळे त्यांच्या पर्यटन उद्योगावर वाईट परिणाम झाला आहे. ऑनलाइन ट्रॅव्हल पोर्टलवरही लोकांनी मालदीवला भेट देण्याचे पर्याय शोधणे बंद केले आहे. त्याऐवजी, लक्षद्वीपचा शोध ३४ पटीने वाढला आहे.

मालदीवचा दररोज मोठ्या प्रमाणात महसूल बुडत आहे. २०२३ मध्ये, जगभरात प्रवास करणाऱ्या भारतीयांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे आणि २०३० पर्यंत भारत चौथ्या क्रमांकावर पोहोचू शकतो. गेल्या वर्षी, भारतीयांनी मालदीवमध्ये ३८० मिलियन  म्हणजेच सुमारे ३,१५२ कोटी रुपये खर्च केले. याचा अर्थ भारतीयांनी तिथे जाणे बंद केले तर मालदीवचे प्रतिदिन ८.६ कोटी रुपयांचे नुकसान होऊ शकते.

ऑनलाइन ट्रॅव्हल बुकिंग मार्केटमध्ये ५० टक्क्यांहून अधिक वाटा असलेल्या MakeMyTrip या पोर्टलने सांगितले की, लक्षद्वीपसाठी गेल्या एका आठवड्यात चौकशी ३,४०० टक्क्यांनी वाढली आहे. पर्यटकांची उदासीनता पाहून आणि त्यांना आकर्षित करण्यासाठी ट्रॅव्हल एजंटांनी मालदीवला भेट देण्याचा खर्चही ४० टक्क्यांनी कमी केला आहे.

उड्डाणेही स्वस्त झाली

फक्त टूर पॅकेजच कमी झालेत असे नाही. भारतातून मालदीवच्या फ्लाइटचे भाडेही कमी झाले आहे. पूर्वी जे भाडे एकेरी २० हजार रुपये असायचे ते आता १२ ते १५ हजार रुपयांवर आले आहे. MakeMyTrip च्या वेबसाइटवर, दिल्ली ते मालदीवचे भाडे फक्त ८,२१५ रुपये दाखवले आहे. 

टॅग्स :मालदीवलक्षद्वीप