Join us

बनावट सीमकार्ड; शिर्डीत एकाला कोठडी ---------

By admin | Updated: September 12, 2014 22:38 IST

शिर्डी : बनावट सीमकार्ड वापरल्याप्रकरणी शिर्डी येथील दहशतवाद विरोधी पथकाने शनिवारी एका परप्रांतीयाला अटक केली़ आरोपीला न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली़

शिर्डी : बनावट सीमकार्ड वापरल्याप्रकरणी शिर्डी येथील दहशतवाद विरोधी पथकाने शनिवारी एका परप्रांतीयाला अटक केली़ आरोपीला न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली़
अमीत वर्मा असे या आरोपीचे नाव असून तो करोलबाग (दिल्ली) येथील रहिवासी आहे़ सध्या तो शिर्डीतील एका हॉटेलवर नोकरीस आहे़ शिर्डीत त्याने पॅन कार्ड तसेच मतदान ओळखपत्र बनवलेले आहे़ तर त्याचे आधारकार्ड उत्तमनगर, साफीलगुडा (आंध्र प्रदेश) येथील आहे़ सहाय्यक पोलीस निरीक्षक बी़ ए़ कदम, उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे, राजेंद्र ससाणे, शरद वाढेंकर, विशाल दळवी हे शहरातील हॉटेल, लॉजिंगची तपासणी करत असताना त्यांनी संशयावरुन वर्माच्या मोबाईलची तपासणी केली़ तपासणीदरम्यान त्याच्याकडील सीमकार्ड पोपट शेळके (धामोरी, ता़ कोपरगाव) याच्या नावावर असल्याचे आढळून आले़ दुसर्‍या व्यक्तीचे कागदपत्र तयार करून सीमकार्ड वापरल्याप्रकरणी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले़ शिर्डीत अनेक परप्रांतीय वास्तव्यास आहेत़ मात्र, त्यातील अनेकांनी स्थानिकांच्या नावाचे कागदपत्रे देऊन मोबाईल सीमकार्ड मिळवले आहे़ तर अनेक व्यवसायिकांनी स्वत:च्या नावावर परप्रांतीय कामगारांना मोबाईल सीमकार्ड दिले आहे़ काम सोडल्यानंतरही अशा कामगारांचे सीमकार्ड परत घेण्यात आलेले नाही़ बनावट सीमकार्ड वापरल्याप्रकरणी अटक होण्याची शिर्डीतील ही दुसरी घटना आहे़ (प्रतिनिधी)