Join us
Daily Top 2Weekly Top 5

कांदा आयातीसाठी अखेर निविदा

By admin | Updated: August 21, 2015 22:04 IST

कांद्याच्या आकाशाला भिडणाऱ्या किमतींवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सरकारने चालविले असून सार्वजनिक क्षेत्रातील एमएमटीसीने पाकिस्तान

नवी दिल्ली : कांद्याच्या आकाशाला भिडणाऱ्या किमतींवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सरकारने चालविले असून सार्वजनिक क्षेत्रातील एमएमटीसीने पाकिस्तान, चीन आणि अफगाणिस्तानमधून कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. दहा हजार टन कांद्याच्या आयातीसाठी निविदा मागविण्यात आली आहे. महाराष्ट्रातील लासलगाव येथे कांद्याच्या ठोक दरात मोठी वाढ झाली. कांदा प्रति किलो ५४ रुपयांवर पोहोचला, तर दिल्लीत कांद्याने सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले असून येथे प्रतिकिलोचा दर ८० रुपयांपर्यंत पोहोचला आहे.या पार्श्वभूमीवर कांदा आयातीचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार दहा हजार टन कांदा आयात करण्यासाठी या निविदा मागविण्यात येणार आहेत. २७ आॅगस्टपर्यंत या निविदा इच्छुकांना सादर करता येतील.