Join us

दहा मोबाईल टॉवर कुलूपबंद; सेवा विस्कळीत परवाना नूतनीकरणास कंपन्यांची टाळाटाळ; मनपाची कारवाई

By admin | Updated: September 11, 2014 22:31 IST

अकोला: व्यावसायिक संकुल, रहिवासी इमारतींवर मोबाईल टॉवर उभारण्यासंदर्भातील नवीन निकष पायदळी तुडविणार्‍या विविध मोबाईल कंपन्यांचे दहा टॉवर सील (कुलूपबंद) करण्याची कारवाई महापालिकेने ११ सप्टेंबर रोजी केली. दुपारी ३ वाजता नंतर मोबाईल सेवा खंडित होताच, नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. मनपाच्या कारवाईमुळे मोबाईल कंपन्यांच्या पायाखालची वाळू सरकली असून, वरिष्ठ अधिकार्‍यांची मनधरणी सुरू केल्याची माहिती आहे.

ग्रामीण भागासह मनपा क्षेत्रात मोबाईल टॉवर उभारण्यासंदर्भात राज्य शासनाने नवीन नियमावली लागू केली. नवीन निकषानुसार मोबाईल कंपन्यांनी परवान्याचे नूतनीकरण करणे क्रमप्राप्त आहे; परंतु नवीन नियमावली क्लिष्ट असल्याची सबब पुढे करीत कंपन्यांनी नवीन प्रस्ताव संबंधित यंत्रणेक डे सादरच केले नाहीत. यासंदर्भात मनपा आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या आदेशानुसार शहरात टॉवर उभारलेल्या मोबाईल कंपन्यांना जून महिन्यात नोटीस जारी करण्यात आल्या. यामध्ये विविध भागात उभारण्यात आलेल्या ११५ मोबाईल टॉवरपैकी फक्त ७० टॉवरला मनपाकडून अधिकृत मंजुरी देण्यात आल्याचे समोर आले. उर्वरित २५ टॉवर बेकायदेशीर असून, विविध त्रुट्या असल्यामुळे १८ टॉवरचे प्रकरण प्रलंबित आहे. संबंधित कंपन्यांनी मोबाईल टॉवरचे नूतनीकरण करणे आवश्यक असताना मनपाच्या नोटीसकडे कंपन्यांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले. त्या पृष्ठभूमीवर सहाय्यक नगर रचनाकार संदीप गावंडे, दक्षिण झोनचे क्षेत्रीय अधिकारी कैलास पुंडे यांनी दक्षिण झोनमधील दहा मोबाईल टॉवर सील केले. टॉवर सील केल्यामुळे शहरातील भ्रमणध्वनी सेवा खंडित झाली असून नागरिक त्रस्त झाले आहेत.

बॉक्स...
या कंपन्यांना लावले सील
एअरटेल-०३ टॉवर
आयडिया-०२ टॉवर
डोकोमो-०२ टॉवर
युनिनॉर-०२ टॉवर
वोडाफोन-०१ टॉवर