नवी दिल्ली : भारतीय दूरसंचार उद्योगाने २०१५ मध्ये १०० कोटी ग्राहकांचा टप्पा भलेही पार केला असेल; पण कॉल ड्रॉपमुळे रंगाचा भंग झाल्याचे दिसून येत आहे. नव्या वर्षात रिलायन्सची जियो सेवा दाखल होत आहे. या पार्श्वभूमीवर दूरसंचार कंपन्यांतील स्पर्धा तीव्र होण्याची शक्यता आहे. नेटवर्कच्या मुद्यावरून सरकारने मोबाईल कंपन्यांना इशारा दिल्यानंतरही त्यात फारशी सुधारणा झाल्याचे दिसत नाही. कारण कॉल ड्रॉपचे प्रमाण अद्यापही कमी झाले नाही. अर्थात सरकारला विश्वास आहे की, नवीन वर्षात कॉल ड्रॉपची समस्या जवळपास संपलेली असेल. कारण अनेक कंपन्या नवीन टॉवर उभारत आहेत. कंपन्यांसाठी स्पेक्ट्रमही लवकरच उपलब्ध होऊ शकतात. दूरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितले की, सरकार लवकरच स्पेक्ट्रमचा लिलाव करणार आहे. तथापि, ही बाब ट्रायच्या शिफारशींवर अवलंबून आहे. स्पेक्ट्रमच्या बाबतीतील नियम यापूर्वीच लागू करण्यात आले आहेत. नव्या वर्षात ग्राहकांना काही नव्या योजना किमान दरात मिळू शकतात. मोबाईल फोन आणि अतिरिक्त फिचर यावर सरकार नवे धोरण तयार करत आहे. यामुळे ग्राहक स्थानिक भाषेत संवाद करू शकतात. प्रशासनातील अनेक बाबी नागरिकांना मोबाईलवर उपलब्ध करून देण्याचा विचार आहे. ई पेमेंटसारखे अनेक फिचर त्यासाठी दाखल केले जातील.
दूरसंचार ग्राहक १०० कोटींवर
By admin | Updated: December 30, 2015 01:42 IST