Join us  

केबल TV ग्राहकांसाठी खूशखबर, 130 रुपयांत मिळणार आता 200 चॅनल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2020 6:16 PM

ट्रायनं नवीन नियम जारी केले असून, टीव्ही पाहणे आता आणखी स्वस्त होणार आहे.

मुंबईः ट्रायनं नवीन नियम जारी केले असून, टीव्ही पाहणे आता आणखी स्वस्त होणार आहे. एक मार्चपासून या नव्या नियमांची अंमलबजावणी करण्यात येणार असून, वाहिन्यांच्या दराची पुनर्रचना होणार आहे. पहिल्यांदा 130 रुपयांत फ्री टू एअरचे 100 चॅनल पाहायला मिळत होते. आता 130 रुपयांत 200 चॅनल मिळणार आहेत.    टेलिकॉम रेग्युलेटर (TRAI)ने केबल नेटवर्क ग्राहकांसाठी नव्या वर्षात मोठं गिफ्ट दिलं आहे. ट्रायनं टॅरिफ यादी जारी केली असून, ज्यात ग्राहकांना 130 रुपयांत 200 फ्री टू एअर चॅनल पाहायला मिळणार आहेत. तत्पूर्वी 130 रुपयांत 100 चॅनल मोफत मिळत होते. या नव्या निर्णयाची अंमलबजावणी 1 मार्च 2020पासून केली जाणार आहे. तसेच 12  रुपयांहून जास्त किमतीचे चॅनल पॅकेजमध्ये समाविष्ट करण्यात येणार नाहीत. कंपन्यांना टॅरिफची माहिती 15 जानेवारीला वेबसाइटवर टाकावी लागणार आहे. ट्रायनं गेल्या वर्षीच नवी ब्रॉडकास्ट टॅरिफ व्यवस्था सुरू केलेली आहे. या व्यवस्थेनुसार प्रेक्षकांना जे चॅनल पाहायचे आहेत, त्याचेच पैसे द्यावे लागतात. पहिल्यांदा ब्रॉडकास्टर्स पॅकेजनुसार चॅनल उपलब्ध करून देते होते. त्यामुळे जे चॅनल आपण पाहत नव्हतो, त्याचेही पैसे मोजावे लागत होते. ट्रायनं जेव्हा ब्रॉडकास्ट टॅरिफ व्यवस्था लागू केली. त्यानंतर प्रेक्षकांना 100 फ्री टू एअर चॅनल देण्यात आले, ज्यात 26 चॅनल दूरदर्शनचे होते. या चॅनलवरचा कर हटवून 130 रुपये वसूल करण्यात येत होते. त्याशिवाय अधिकचे आवडीचे चॅनल पाहण्यासाठी अतिरिक्त शुल्क आकारलं जातं. आता नव्या ब्रॉडकास्ट टॅरिफ व्यवस्थेमध्ये केबल TV आणि DTH ग्राहकांच्या बिलामध्ये वाढ होणार असल्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. तसेच क्रिसिलच्या रिपोर्टनुसार, केबल टीव्ही आणि डायरेक्ट टू होम(DTH) ग्राहकांचं बिल वाढलं आहे. परंतु ट्रायनं हा रिपोर्ट चुकीचा असल्याचं सांगितलं आहे. 

टॅग्स :ट्राय