Join us

तेजस्विनी सागरला गोल्ड

By admin | Updated: June 15, 2015 21:29 IST

एशियन रॅपिड चेस चॅम्पियनशिप : ७ पैकी ५़५ गुण मिळवीत अजिंक्य

एशियन रॅपिड चेस चॅम्पियनशिप : ७ पैकी ५़५ गुण मिळवीत अजिंक्य
सिंगापूर येथे झालेल्या एशियन रॅपिड चेस चॅम्पियनशिपमध्ये औरंगाबादच्या तेजस्विनी सागर हिने जबरदस्त कामगिरी करताना सुवर्णपदकाची कमाई केली़
या स्पर्धेत १६ वर्षांखालील मुलींच्या गटात तेजस्विनीने ७ पैकी ५़५ गुण मिळवीत अजिंक्यपदावर आपले नाव कोरले़ तिने ४ डावांमध्ये बाजी मारली, तर ३ डाव बरोबरीत सोडण्यात तिला यश आहे़
स्पर्धेत तेजस्विनीने प्रथम मानांकनप्राप्त इंडोनेशियाच्या लेगोवो परहिता, गिगीओ पयोनो, डाँग कान लिंच, फाल नगुयन यांना धूळ चारली, तर बी़ ओयुदरी, नादेरा कॅमेल, ट्रॅन फान बाओ यांना बरोबरीत रोखले़