नवी दिल्ली : आयकर विभागाने आयकर विवरण पत्रात नमूद स्त्रोतातून कर कपातीत (टीडीएस) आॅनलाईन दुरुस्ती करण्याची प्रक्रिया सोपी केली आहे. करदात्यांच्या सुविधेसाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. वित्त मंत्रालयाच्या माहितीनुसार आता टीडीएस तपशिलात आॅनलाईन दुरुस्तीसाठी आधी दाखल करण्यात आलेल्या टीडीएससंदर्भातील माहिती उपलब्ध होईल. जेणेकरून करदात्यांना टीडीएससंबंधी संपूर्ण तपशील विवरणपत्रात नमूद करावा लागणार नाही.
टीडीएस आॅनलाईन दुरुस्ती झाली सोपी
By admin | Updated: December 10, 2015 23:30 IST