Join us  

‘एच-१बी’साठी प्रमाणपत्र मिळणाऱ्या टॉप-१० कंपन्यांत टीसीएस!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2018 3:05 AM

२०१८ या वित्त वर्षात एच-१बी व्हिसासाठी विदेशी कामगार प्रमाणपत्र (फॉरेन लेबर सर्टिफिकेशन) मिळविणा-या जगातील सर्वोच्च १० कंपन्यांत भारतातील एकमेव टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) या कंपनीचा समावेश झाला आहे.

वॉशिंग्टन : २०१८ या वित्त वर्षात एच-१बी व्हिसासाठी विदेशी कामगार प्रमाणपत्र (फॉरेन लेबर सर्टिफिकेशन) मिळविणा-या जगातील सर्वोच्च १० कंपन्यांत भारतातील एकमेव टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) या कंपनीचा समावेश झाला आहे. टीसीएसला २० हजारांपेक्षा जास्त विदेशी कामगार प्रमाणपत्रे मिळाली आहेत.एच-१बी व्हिसासाठी अर्ज करण्यापूर्वी अमेरिकेच्या श्रम मंत्रालयाला एक अर्ज करून विदेशी कामगार प्रमाणपत्र मिळविणे कंपन्यांसाठी बंधनकारक आहे. जेवढ्या कामगारांसाठी प्रमाणपत्रे मिळाली असतील, तेवढ्याच कामगारांच्या व्हिसासाठी कंपन्या अर्ज करू शकतात.अमेरिकी कामगार मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, लंडनस्थित अर्न्स्ट अँड यंग ही कंपनी सर्वाधिक विदेशी कामगार प्रमाणपत्रे मिळवून पहिल्या स्थानी आली आहे. कंपनीला विशेष व्यवसायासाठी १,५१,१६४ विदेशी कामगार प्रमाणपत्रे मिळाली आहेत. अमेरिकी कामगार मंत्रालयाने वितरित केलेल्या एकूण प्रमाणपत्रांपैकी १२.४ टक्के प्रमाणपत्रे अर्न्स्ट अँड यंगला मिळाली आहेत. ६९,८६९ प्रमाणपत्रांसह डेलॉईट कन्सल्टिंग दुसºया स्थानी आहे. भारतीय-अमेरिकी कंपनी कॉग्निझंट टेक्नॉलॉजी तिसºया स्थानी असून, कंपनीला ४७,७३२ प्रमाणपत्रे मिळाली आहेत. कॉग्निझंटनंतर एचसीएल अमेरिका (४२,८२०), के फोर्स आयएनसी (३२,९९६), अ‍ॅपल (२६,८३३) यांचा क्रमांक लागला.सर्वोच्च १० कंपन्यांत स्थान मिळविणारी टीसीएस ही एकमेव भारतीय कंपनी ठरली आहे. टीसीएसला विशेष व्यवसायासाठी (स्पेशालिटी आॅक्युपेशन) २०,७५५ विदेशी कामगार प्रमाणपत्रेमिळाली आहेत. सर्वोच्च १०कंपन्यांत टीसीएसनंतर क्वॉलकॉम टेक्नॉलॉजीज (२०,७२३), एमफसिस कॉर्पोरेशन (१६,६७१) आणि कॅपजेमिनी अमेरिका (१३,५१७) यांचा क्रमांक लागला. (वृत्तसंस्था)>यामुळेच नोकºया शक्यभारतातील आयटी व्यावसायिकांत एच-१बी व्हिसा लोकप्रिय आहे. हा बिगर आव्रजन व्हिसा असून, या व्हिसाद्वारे अमेरिकेतील कंपन्या विदेशी कामगारांना तात्पुरत्या स्वरूपात कामावर ठेवू शकतात. विशेष व्यवसाय अथवा कौशल्य, फॅशन मॉडेल आणि अद्वितीय गुणवत्ता अथवा क्षमताधारकांना या व्हिसावर अमेरिकेत आणता येते.

टॅग्स :टाटा