Join us

एसी हॉटेलात खाद्यपदार्थांवर १८ ते २८ टक्के लागणार कर

By admin | Updated: June 16, 2017 03:21 IST

वस्तू आणि सेवा कराचे दर निश्चित झाल्यापासून कोणत्या वस्तूवर आणि सेवेवर किती कर लागेल आणि त्याचा आपल्या जगण्यावर काय परिणाम

- उमेश शर्मा, चार्टर्ड अकाउंटंटवस्तू आणि सेवा कराचे दर निश्चित झाल्यापासून कोणत्या वस्तूवर आणि सेवेवर किती कर लागेल आणि त्याचा आपल्या जगण्यावर काय परिणाम होणार, हे जाणून घेण्याची उत्सुकता साऱ्यांनाच आहे. काही वस्तू आणि काही सेवा स्वस्त अथवा महाग होणार आहेत. हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये जाणे नित्याचेच झालेले असताना त्यासंबंधी होणारे बदल जाणून घ्या...एअर कंडिशनर रेस्टॉरंट नसल्यास आणि मद्याचा परवाना नसेल तर 12%जीएसटी दर लागेल.सध्या हॉटेल, रेस्टॉरंट आदी व्यावसायिक व्हॅट कम्पोझिशन योजनेअंतर्गत 5%कर भरायचे.सर्व्हिस टॅक्समध्ये जीएसटी अंतर्गत एसी रेस्टॉरंट असल्यास 6% सर्व्हिस टॅक्स भरायचे.एअर कंडिशनर रेस्टॉरंट असल्यास18% जीएसटीचा दर लागेल.पंचतारांकित रेस्टॉरंट असल्यास २८ टक्केजीएसटीचा दर लागेलखाद्य पदार्थ, हॉटेल जेवण इत्यादी खर्चावर कोणालाही इनपूट टॅक्सचे क्रेडिट मिळणार नाही.मद्य, दारू, बीयर इत्यादी वस्तू ज्या की मनुष्याच्या उपभोगासाठी वापरल्या जातील, त्या जीएसटीच्या कक्षेबाहेर आहेत. यावर व्हॅट इत्यादी कर भरावा लागेल.75 लाखांच्या आत ज्याची वार्षिक उलाढाल असल्यास ५ टक्के जीएसटी कम्पोझिशन स्कीम अंतर्गत भरावा लागेल.आता जीएसटीत हॉटेल व्यावसायिक, केटरिंग, इत्यादीवर सेवा पुरविणारे या कॅटेगरीत येणार आहे.केटरिंग इत्यादी बाहेर खाण्याच्या सुविधा दिल्यास १८% जीएसटीचा दर लागेल.अनोंदणीकृत व्यक्तीकडून या खाण्यापिण्याच्या वस्तू खरेदी केल्यास खरेदीदाराला रिव्हर्स चार्ज पद्धती अनुसार कर भरावा लागू शकेल.