Join us

२४६ कोटींवर भरला १०८ कोटी रुपयांचा कर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2017 00:44 IST

नोटाबंदीनंतर तामिळनाडू आणि पडुचेरीत नागरिकांनी ६०० कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जमा केल्या आहेत. पण, एक व्यक्ती

चेन्नई : नोटाबंदीनंतर तामिळनाडू आणि पडुचेरीत नागरिकांनी ६०० कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जमा केल्या आहेत. पण, एक व्यक्ती अशीही आहे की ज्याने तब्बल २४६ कोटी रुपयांच्या जुन्या नोटा या कालावधीत जमा केल्या आहेत. एका अधिकाऱ्याने सांगितले की, तिरुचेगोड येथे एका व्यक्तीने इंडियन ओव्हरसीज बँकेत २४६ कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जमा केल्या आहेत. आयकर विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, एवढी मोठी रक्कम जमा झाल्याची माहिती मिळताच आम्ही या व्यक्तीचा १५ दिवस पाठलाग केला. नंतर या व्यक्तीने ४५ टक्के कर भरण्याची तयारी दर्शविली. यातील २५ टक्के रक्कम सरकारकडे राहणार असून या व्यक्तीला त्याचे व्याजही मिळणार नाही. आयकर विभागाला तामिळनाडूू आणि पडुचेरीत २८ हजार संशयित खाते आढळले आहेत. (वृत्तसंस्था)