नवी दिल्ली : २0१५-१६ च्या अर्थसंकल्पातील करप्रस्तावांचा सर्वाधिक फटका ज्येष्ठ नागरिकांना बसणार आहे. १ कोटीपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या आणि ६0 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना ६४,५५0 रुपयांचा अतिरिक्क कर द्यावा लागणार आहे. ६0 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या लक्षाधीशांना मात्र करप्रस्तावांतून सर्वाधिक लाभ होणार आहे. १0 लाखांच्या वर आणि १ कोटीपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या ६0 वर्षांच्या आतील वयातील नागरिकांना एका वर्षांत २४,५९६ रुपयांची अतिरिक्त बचत करता येऊ शकेल. या उत्पन्न गटातील वरिष्ठ नागरिकांना २१,६३0 रुपयांची बचत करता येईल. ६0 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांचे उत्पन्न १ कोटीपेक्षा जास्त असेल तर त्यांना अतिरिक्त ६४,५५0 रुपये करापोटी मोजावे लागतील. ६0 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या आणि १ कोटीपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या नागरिकांना मात्र थोडा कमी ६१,२७१ रुपयांचा अतिरिक्त कर बसेल. आजपर्यंतच्या अर्थसंकल्पांत ज्येष्ठ नागरिकांना करांतून अधिक सवलती देण्याचा कल राहत आला आहे. अरुण जेटली यांनी या परंपरेला छेद दिल्याचे या क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले.
ज्येष्ठांवर करांचा अधिक बोजा !
By admin | Updated: March 1, 2015 23:16 IST