Join us
Daily Top 2Weekly Top 5

करवसुली वाढली, सरकारला दिलासा, ६७ टक्के लक्ष्य पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 00:21 IST

जीएसटीमुळे केंद्राच्या अप्रत्यक्ष कर महसुलातील घट प्रत्यक्ष कराने भरून काढली आहे. आर्थिक वर्ष २०१७-१८ च्या पहिल्या नऊ महिन्यातील करवसुलीत १८.२ टक्क्यांची वाढ झाली आहे. एकूण ६.५६ लाख कोटी रुपयांच्या वसुलीसह या आर्थिक वर्षाचे ६७ टक्के लक्ष्य पूर्ण झाले आहे.

नवी दिल्ली : जीएसटीमुळे केंद्राच्या अप्रत्यक्ष कर महसुलातील घट प्रत्यक्ष कराने भरून काढली आहे. आर्थिक वर्ष २०१७-१८ च्या पहिल्या नऊ महिन्यातील करवसुलीत १८.२ टक्क्यांची वाढ झाली आहे. एकूण ६.५६ लाख कोटी रुपयांच्या वसुलीसह या आर्थिक वर्षाचे ६७ टक्के लक्ष्य पूर्ण झाले आहे.केंद्र सरकारने २०१७-१८ या आर्थिक वर्षात ९.८० लाख कोटी प्रत्यक्ष कर वसुलीचे लक्ष्य ठेवले आहे. केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या महसूल विभागाने एप्रिल ते डिसेंबर २०१७ ची आकडेवारी जारी केली. त्यानुसार ६.५६ लाख कोटी रुपयांचा कर वसुल झाला आहे. यामध्ये प्राप्तिकर आणि कॉर्पोरट कर या दोन्हींचा समावेश आहे. परतावा देण्याआधीच्या ढोबळ कर वसुलीत १२.६ टक्क्यांची वाढ झाली आहे.एप्रिल ते डिसेंबरदरम्यान ही वसुली ७.६८ लाख कोटी रुपये राहिली आहे. या नऊ महिन्यांत १.१२ लाख कोटी रुपयांचा परतावा देण्यात आला आहे. यावर्षीच्या आगाऊ कर वसुलीतही १२.७ टक्क्यांची वाढ होऊन ती ३.१८ लाख कोटी रुपये राहिली आहे. तर कॉर्पोरेट प्राप्ती करातील आगाऊ कर भरण्यात १०.९ टक्के आणि आगाऊ वैयक्तिक प्राप्तिकर भरणा २१.६ टक्क्यांनी वाढला आहे.एकूण महसुलात ६० टक्के वाटाएप्रिल ते डिसेंबर २०१७ दरम्यान २.६५ लाख कोटींचा अप्रत्यक्ष कर महसूल गोळा झाला. यानुसार, प्रत्यक्ष कर महसूल ६.५६ लाख कोटी रुपये आहे. याचाच अर्थ देशाच्या एकूण कर महसुलात प्रत्यक्ष कराचा वाटा ६० टक्के आहे. एकूण महसुलात प्रत्यक्ष कर अधिक असणे देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी सकारात्मक चित्र असल्याचे मानले जाते, हे विशेष.

टॅग्स :कर