Join us  

करकपातीने सरकारी कंपन्यांना १९,३०० कोटींचा होणार फायदा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2019 2:59 AM

सरकारी कंपन्यांना अंदाजे १९,३०० कोटी कमी कर नफ्यावर भरावा लागणार

मुंबई : कंपनी कराचा दर ३४.२० वरून २५.१० टक्के कमी झाल्याने सरकारी कंपन्यांना अंदाजे १९,३०० कोटी कमी कर नफ्यावर भरावा लागणार आहे, असे एका सर्वेक्षणात समोर आले आहे. मजेची बाब म्हणजे, सरकारी कंपन्या जो लाभांश (डिव्हिडंड) सरकारला देतात, त्यापोटी केंद्र सरकारला या वर्षी १०,००० कोटी परत मिळतील, असेही या सर्वेक्षणात उघड झाले.काही प्रमुख कंपन्यांची कर बचत अशी असेल (रु. कोटी)आॅईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (ओएनजीसी) - ७,०९५कोल इंडिया लिमिटेड (सीआयएल) - २,८३५इंडियन आॅईल कॉर्पोरेशन लि. (आयओसीएल) - २,१२७भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. (बीपीसीएल) - १,१२९गॅस अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडिया लि. (जीएआयएल) - ८०४नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पो. (एनएमडीसी) - ७४६नेव्हेली लिग्नाईट कॉर्पो. (एनएलसी) - ६७८नॅशनल हायड्रो पॉवर कॉर्पो. (एनएचपीसी) - ४८९हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लि. (एचएएल) - ४३७भारत हेवी इलेक्ट्रीकल्स लि. (बीएचईएल) - ३७५नॅशनल अ‍ॅल्युमिनियम कंपनी (एनएएलसीओ) - ३१८स्टील अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडिया (एसएआयएल) - ३०७आॅईल इंडिया लि. (ओआयएल) - २६२मँगलोर रिफायनरीज अँड पेट्रोकेमिकल्स (एमआरपीएल) - १३६भारत इलेक्ट्रॉनिक्स लि. (बीईएल) - ११९

टॅग्स :कर