Join us
Daily Top 2Weekly Top 5

स्वीस बँक प्रकरण; ‘जागल्या’ला हवे संरक्षण

By admin | Updated: November 3, 2015 02:16 IST

स्वीत्झर्लंडमधील एचएसबीसी बँकेत खाती असलेल्या भारतीयांच्या नावांची यादी ज्याने सर्वप्रथम फोडली त्या ‘जागल्या’ने संरक्षण दिल्यास भारत सरकारने सुरू केलेल्या विदेशातील काळ्या

नवी दिल्ली : स्वीत्झर्लंडमधील एचएसबीसी बँकेत खाती असलेल्या भारतीयांच्या नावांची यादी ज्याने सर्वप्रथम फोडली त्या ‘जागल्या’ने संरक्षण दिल्यास भारत सरकारने सुरू केलेल्या विदेशातील काळ्या पैशांच्या शोधात सहकार्य देण्याची तयारी दर्शविली आहे.एचएसबीसी बँकेच्या जिनिव्हा शाखेतील एक माजी कर्मचारी हर्व फाल्सियानी याने त्या बँकेत असलेल्या भारतीय खातेदारांच्या नावांची यादी सर्वप्रथम उघड केली होती. पुढे ती यादी फ्रेंच सरकारच्या हाती लागली व त्यांनी ती माहिती भारताला दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या निगराणीखाली नेमलेले विशेष तपासी पथक भारतीयांनी विदेशात दडविलेल्या काळ्या पैशाचा सध्या जो शोध घेत आहे त्यात या यादीतील नावांचाही समावेश आहे.स्वीस बँका त्यांच्या खातेदारांच्या तपशिलाबाबत कमालीची गुप्तता पाळतात. या गोपनीयतेचा भंंग केल्याबद्दल फाल्सियानी यांच्याविरुद्ध स्वित्झर्लंडमध्ये फौजदारी कारवाई सुरु आहे. भारतातील प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींशी फाल्सियानी यांनी सोमवारी स्कायपेच्या माध्यमातून संवाद साधला. (लोकमत न्यूज नेटवर्क)