सुशीलकुमारांच्या स्वागताला गर्दी
By admin | Updated: June 20, 2014 21:24 IST
सोलापूर :
सुशीलकुमारांच्या स्वागताला गर्दी
सोलापूर : माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या स्वागताला काँग्रेस कार्यकर्त्यांनी सोलापूर रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी केली होती़ नेहमीपेक्षा पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली होती़सिद्धेश्वर एक्स्प्रेसने सुशीलकुमार शिंदे यांचे आज सकाळी सोलापुरात आगमन झाल़े रेल्वे स्थानकावर त्यांचे स्वागत करण्यासाठी काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते यांची गर्दी झाली होती़ ज्येष्ठ नेते विष्णुपंत कोठे, आमदार दिलीप माने, शहराध्यक्ष प्रकाश यलगुलवार, महिला आघाडीच्या अध्यक्षा ज्योती वाघमारे, सुधीर खरटमल, विश्वनाथ चाकोते, महेश कोठे, इंदुमती अलगोंडा-पाटील, चेतन नरोटे, भीमाशंकर जमादार, चंद्रकांत सुर्वे, सलीम शेख, अँड़ अर्जुन पाटील-ब्र?ापुरीकर यांनी पुष्पगुच्छ देऊन शिंदे यांचे स्वागत केल़े काँग्रेस पक्षाचा विजय असो, सुशीलकुमार शिंदे आगे बढो़़़ या घोषणांनी कार्यकर्त्यांनी स्टेशनचा परिसर दणाणून सोडला़ शिंदे यांच्या स्वागतासाठी शहर आणि जिल्?ातील कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती़ गर्दीतून स्वागत स्वीकारत बाहेर पडताना शिंदे यांना वेळ लागला़ याच गर्दीमुळे तपासणीसाठी ठेवलेले धातूशोधक यंत्र कोलमडल़े स्टेशनवर अँड़ कल्याणराव हिप्परगे, प्रा़ अजय दासरी, केशव इंगळे, अनिल पल्ली, केदार उंबरजे, मोतीराम राठोड आदी उपस्थित होत़े मात्र माजी शहराध्यक्ष धर्मा भोसले, माजी महिला अध्यक्षा सुमन जाधव, माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके यांची अनुपस्थिती जाणवली़ तिघांनीही नंतर जनवात्सल्यवर जाऊन शिंदे यांचे स्वागत केल़े फोटो - यशवंत सादुल यांनी काढलेला फोटो वापरावा