लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : सूक्ष्म आणि छोट्या उद्योगांना आधार देण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. रेल्वेला लागणाऱ्या ३५८ वस्तू सूक्ष्म आणि छोट्या उद्योगांकडूनच घेतल्या जाणार आहेत.यामध्ये स्वच्छता उपकरणे, स्टेशनरी आणि कातडी वस्तूंचा समावेश आहे. त्याचबरोबर रेल्वेच्या निविदा प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी सूक्ष्म आणि छोट्या उद्योगांना निविदा खर्च आणि आगाऊ अनामत रक्कम भरण्याचीही गरज राहणार नाही. सूत्रांनी सांगितले की, भारतीय रेल्वेच्या खरेदी पोर्टलवर ९,९७३ सूक्ष्म व लघुउद्योग पुरवठादारांनी नोंदणी केलेली आहे. या क्षेत्राकडून वर्षाला ४,४00 कोटी रुपयांच्या वस्तू रेल्वे खरेदी करते. या प्रक्रियेतील त्यांचा सहभाग वाढविण्यासाठी कृती आराखडा रेल्वेने तयार केला आहे. हस्तकला, पेंटिंग ब्रश यासारख्या ३५८ वस्तू सूक्ष्म आणि छोट्या उद्योगासाठी राखीव ठेवतानाच इतरही अनेक वस्तू पुरविण्याची परवानगी या क्षेत्राला दिली जाणार आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, सूक्ष्म आणि लघुउद्योग क्षेत्राला रेल्वेच्या अनेक व्यवसायात सहभागी करून घेतले जाणार आहे. त्यात देखभाल, रोलिंग साठ्याचे परिचालन, केबल, तागाचे कापड, पेंट, यांत्रिक सुटे भाग, वॉल पॅनलिंग, यंत्रांचे कटिंग आणि ड्रिलिंग याचा समावेश आहे.>रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत बैठकअलीकडेच रेल्वेने एक महत्त्वपूर्ण बैठक बोलावली होती. सूक्ष्म आणि लघुउद्योगाकडून अधिकाधिक वस्तू खरेदी करण्यावर या बैठकीत विचारविनिमय करण्यात आला.या बैठकीला रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची विशेष उपस्थिती होती. रेल्वे, तसेच लघुउद्योग विकास बँकेचे वरिष्ठ अधिकारी आणि सूक्ष्म व लघुउद्योजक क्षेत्रातील पुरवठादारांची बैठकीला उपस्थिती होती.सूक्ष्म व लघुउद्योग क्षेत्राला रेल्वेने साह्य करावे, अशी मागणी या वेळी उपस्थितांनी केली. ती मान्य करून निर्णय घेण्यात आले, असे सूत्रांनी सांगितले.
भारतीय रेल्वे देणार छोट्या उद्योजकांना आधार
By admin | Updated: July 12, 2017 00:06 IST