Join us

चिनी मोबाईल कंपनी झिओमीला टाटांचे पाठबळ

By admin | Updated: April 26, 2015 14:20 IST

स्वस्त दरात अत्याधूनिक तंत्रज्ञान असलेले मोबाईल देत भारतात पाऊल ठेवणा-या झिओमी या चिनी मोबाईल कंपनीला आता रतन टाटा यांचे आर्थिक पाठबळ मिळाले आहे.

ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि. २६ - स्वस्त दरात अत्याधूनिक तंत्रज्ञान असलेले मोबाईल देत भारतात पाऊल ठेवणा-या झिओमी या चिनी मोबाईल कंपनीला आता रतन टाटा यांचे आर्थिक पाठबळ मिळाले आहे. टाटा समुहाने झिओमीमध्ये गुंतवणूक केल्याची घोषणा झिओमीने केली असून या गुंतवणूकीचा आकडा अद्याप गुलदस्त्यात आहे. 
चीनमधील झिओमी या मोबाईल हँडसेट तयार करणा-या कंपनीने आता भारतातही पाऊल ठेवले असून गेल्या काही महिन्यांमध्ये झिओमीच्या भारतातील ग्राहकांची संख्या लक्षणीयरित्या वाढत आहे. झिओमीत आत्तापर्यंत एकाही भारतीयाने गुंतवणूक केलेली नव्हती. मात्र आता झिओमी रतन टाटांची साथ मिळाली आहे. रतन टाटा यांनी झिओमीत गुंतवणूक केली आहे अशी घोषणा झिओमीचे उपाध्यक्ष ह्यूगो बारा यांनी ट्विटरद्वारे केली आहे. 
मोबाईल व इंटरनेट क्षेत्रातील वाढती मागणी बघता भारतातील उद्योजकांनी या क्षेत्रात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे. रतन टाटा यांनी काही महिन्यांपूर्वी पेटीएम व स्नॅपडील या कंपन्यांमध्येही गुंतवणूक केली होती.