Join us
Daily Top 2Weekly Top 5

सारांश जोड

By admin | Updated: April 18, 2015 01:43 IST

संस्कार भारतीतर्फे गीतरामायण कार्यक्रम

संस्कार भारतीतर्फे गीतरामायण कार्यक्रम
नागपूर : महानगर संस्कार भारतीतर्फे गीतरामायणाचा कार्यक्रम रामनगर येथील राम मंदिरात आयोजित करण्यात आला. याप्रसंगी दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे संचालक पीयूषकुमार प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन मुकुंद देशपांडे यांनी केले. यात विजय देशपांडे, जयंत मंग्रुळकर, भाग्यश्री टिकले, विनोद वखरे, माधवी पळसोकर, रघुनाथ बोबडे, मधुरा गडकरी, स्नेहल रानडे यांनी गीत सादर केले. त्यांना दीपक भोजराज व रवी सातफळे, शिरीश भालेराव, गोविंद गढीकर, नरेंद्र कडवे, जयंत उपगडे यांनी विविध वाद्यांवर साथसंगत केली.
-----------
सूक्ष्म यौगिक व्यायाम कार्यशाळा
नागपूर : सत्यानंद योग केंद्र, अकोला आणि निरंजनानंद सेवालय, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने मुंडले सभागृह, अंध विद्यालय, दक्षिण अंबाझरी मार्ग येथे सूक्ष्म यौगिक व्यायाम कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. योगाचार्य डॉ. अजय प्रधान यांनी गुरुमंत्राचा जप करून या कार्यशाळेचे उद्घाटन केले. याप्रसंगी योगशिक्षक अभय गर्दे, प्रवीण डबली, श्रीपाद देसाई, निखिल मुंडले प्रामुख्याने उपस्थित होते. आधुनिक जीवनशैलीत धावपळ वाढली आहे. त्यात मोठे ताणतणाव आहे. यौगिक व्यायामाने मन शांत व स्थिर राहते. त्यामुळे योग व्यायम अत्यंत आवश्यक असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.