Join us

सूट संपली ! डेबिट कार्डवर लागणार सर्व्हिस चार्ज

By admin | Updated: January 2, 2017 08:43 IST

डेबिट कार्डच्या वापरावर सर्व्हिस चार्जमध्ये देण्यात आलेली सूट संपली आहे. त्यामुळे आता डेबिट कार्डवर सव्हिस चार्ज लागणार आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 2 - डेबिट कार्डच्या वापरावर सर्व्हिस चार्जमध्ये देण्यात आलेली सूट संपली आहे. त्यामुळे आता डेबिट कार्डवर सव्हिस चार्ज लागणार आहे. 8 नोव्हेंबरला नोटाबंदी निर्णय जाहीर झाल्यानंतर 31 डिसेंबरपर्यंत डेबिट कार्डच्या वापरावर सर्व्हिस चार्जमध्ये सूट देण्यात आली होती. मात्र ही मर्यादा संपली असून आता सर्व्हिस चार्ज लागणार आहे. पण डेबिट कार्डच्या वापरावरील सर्व्हिस टॅक्सवर देण्यात आलेली सूट मात्र कायम आहे. तसंच एटीएमच्या व्यवहारावर सर्व्हिस चार्जचे नियम लागू नसतील. क्रेडिट कार्डच्या व्यवहारांवर अगोदरप्रमाणेच अडीच टक्के सर्व्हिस चार्ज लागणार आहे. म्हणजे एक हजार रुपयांची खरेदी केली तर 25 रुपये चार्ज लागेल.