Join us

आजाराला कंटाळून हवालदाराची आत्महत्या

By admin | Updated: September 12, 2014 22:38 IST

आजाराला कंटाळून हवालदाराची आत्महत्या

आजाराला कंटाळून हवालदाराची आत्महत्या
गोंदिया : आजाराला कंटाळून हवालदाराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे शुक्रवारी पहाटे उघडकीस आले़ ज्ञानेश्वर आसाराम लांबट (४५) असे या हवालदाराचे नाव असून, ते राज्य गुन्हे अन्वेषण शाखेत (सीआयडी) भंडारा येथे प्रतिनियुक्तीवर होते़
ज्ञानेश्वर लांबट यांना अनेक दिवसांपासून मुतखड्याचा त्रास होता. त्यावर उपचारदेखील सुरू होते. मात्र, हा त्रास अस‘ होत असल्याने कंटाळून आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी त्यांनी लिहून ठेवल्याचे पोलिसांनी सांगितले. ज्ञानेश्वर लांबट गोंदिया पोलीस दलाच्या आस्थापनेवर होते. त्यानंतर त्यांना प्रतिनियुक्तीवर भंडारा येथील सीआयडी युनिट येथे पाठविण्यात आले होते. त्यामुळे पत्नी व दोन मुलांना गोंदियातच ठेवून ते भंडारा येथे ड्युटीवर जात होते. दरम्यान, त्यांना किडनी स्टोनचा त्रास जाणवायला लागला. गुरूवारी रात्री सर्वजण नेहमीप्रमाणे घरात झोपी गेल्यानंतर पहाटेच्या सुमारास त्यांनी घरातच नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. गोंदिया शहर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. (तालुका प्रतिनिधी)