वाशी खाडीपुलावरून आत्महत्येचा प्रयत्न
By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST
नवी मुंबई : धारावी येथील तरुणाने वाशी खाडीपुलावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. मच्छीमारांनी त्याला सुखरूप बाहेर काढले. परंतु बेशुध्द असल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
वाशी खाडीपुलावरून आत्महत्येचा प्रयत्न
नवी मुंबई : धारावी येथील तरुणाने वाशी खाडीपुलावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. मच्छीमारांनी त्याला सुखरूप बाहेर काढले. परंतु बेशुध्द असल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.अक्षय मोर्वे (१९) असे त्याचे नाव असून तो धारावीत राहतो. सायन येथील चेतना कॉलेजचा एस. वाय. बी. कॉमचा तो विद्यार्थी आहे. मंगळवारी संध्याकाळी ५च्या सुमारास त्याने वाशी खाडीपुलावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यापूर्वी त्याने सोबत असलेली कॉलेजची बॅग पुलावरच ठेवली होती. वाशी गावचे मच्छीमार परशुराम भोईर खाडीमध्ये मासेमारी करत होते. त्यांनी मोर्वे याला बुडताना पाहिले आणि त्याला सुखरूप बाहेर काढले. त्याने वाशी पोलिसांनाही याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी अक्षयला उपचारासाठी वाशीतील पालिका रुग्णालयात दाखल केले. अद्याप तो बेशुध्द अवस्थेत असल्याचे पोलीस निरीक्षक सूरज पाडवी यांनी सांगितले. त्याच्या आत्महत्येच्या प्रयत्नाचे कारण अद्याप समजू शकले नाही.(प्रतिनिधी)