Join us

साखरेचे उत्पादन ‘जैसे थे’

By admin | Updated: November 28, 2014 23:45 IST

चालू साखर हंगामात देशातील साखर उत्पादन हे मागील वर्षाएवढेच म्हणजे 25 दशलक्ष टन होण्याचा सुधारित अंदाज आहे.

नवी दिल्ली : चालू साखर हंगामात देशातील साखर उत्पादन हे मागील वर्षाएवढेच म्हणजे 25 दशलक्ष टन होण्याचा सुधारित अंदाज आहे. आधीच्या अंदाजापेक्षा अधिक साखर उत्पादन होणार आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील उसाखालील क्षेत्रत वाढ झाल्याने उत्पादन वाढण्याचा अंदाज आहे.
केंद्रीय अन्न मंत्रलयातर्फे देशातील साखर उत्पादनाचा सुधारित अंदाज जाहीर करण्यात आला आहे. ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या हंगामात 25 दशलक्ष टन साखर उत्पादनाचा अंदाज वर्तविला गेला आहे. 
याआधी सरकारने 24.5 दशलक्ष टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज वर्तविला होता. सुधारित अंदाजामुळे देशात वाढीव साखर उत्पादन गरजेपेक्षा अधिक होण्याचा अंदाज आहे. 
यामुळे साखरेचे दर कमी होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. यामुळेच अन्न मंत्रलयाने कच्च्या साखरेची निर्यात कायम ठेवण्याचे तसेच अनुदानही दोन हंगामासाठी कायम राखण्याचा प्रस्ताव दिला आहे. मात्र आता या साखरेची निर्यात खुल्या परवान्याद्वारे करता येणार नाही. 
निर्यात केल्या जाणा:या साखरेवर 1क् ते 12 लाख टनांची मर्यादा घालण्यात येणार आहे. यासाठीच्या अनुदानाची रक्कम तीन हजार रुपये प्रति मेट्रिक टन असण्याची शक्यता आहे.
(लोकमत न्यूज नेटवर्क)