Join us
Daily Top 2Weekly Top 5

भारतात साखर उत्पादन सात टक्क्यांनी वाढले

By admin | Updated: January 20, 2016 03:08 IST

साखर कारखान्यांनी गाळप लवकर सुरू केल्याने सप्टेंबरमध्ये समाप्त होणाऱ्या या पीक सत्रात १५ जानेवारीपर्यंतच साखर उत्पादन सात टक्क्यांनी वाढून ११०.९० लाख टन झाले.

नवी दिल्ली : साखर कारखान्यांनी गाळप लवकर सुरू केल्याने सप्टेंबरमध्ये समाप्त होणाऱ्या या पीक सत्रात १५ जानेवारीपर्यंतच साखर उत्पादन सात टक्क्यांनी वाढून ११०.९० लाख टन झाले.साखर उत्पादनात भारत हा जगात द्वितीय क्रमांकाचा देश आहे; मात्र भारतातच सर्वात जास्त साखर विक्री होते. २०१४-१५ आॅक्टोबर ते सप्टेंबर या पीक वर्षात याच अवधीत १०३.८२ लाख टन साखर उत्पादन झाले होते. भारतीय साखर कारखाना महासंघाने एका निवेदनात ही माहिती दिली आहे. त्यात म्हटले आहे की, यंदा साखर कारखान्यांनी गाळप थोडे अगोदर सुरू केले होते. त्यामुळे आतापर्यंत कमी प्रमाणात ऊस उपलब्ध होऊनही उत्पादन थोडे वाढले आहे. २०१५-१६ या साखर पीक हंगामात साखरेचे उत्पादन २.६ कोटी टन ते २.७ कोटी टन होण्याची शक्यता आहे.