Join us

ेसारांंश

By admin | Updated: July 12, 2015 23:56 IST

दुर्गानगर परिसरात कचऱ्याची गाडी फिरवावी

दुर्गानगर परिसरात कचऱ्याची गाडी फिरवावी
नागपूर : दुर्गानगर परिसरात महानगरपालिकेतर्फे फिरविण्यात येणारी कचऱ्याची गाडी दर तीन दिवसाआड येते. यामुळे नागरिकांच्या घरात तुंबलेला कचरा फेकण्यासाठी त्रास होत आहे. त्यात काही लोक रस्त्यावर कचरा फेकतात त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. एखाद्या ठिकाणी कचरा पडलेला असल्यास तेथे पुन्हा कचरा टाकला जातो आणि कचऱ्याचा ढीग निर्माण होतो. दुर्गानगर परिसरात रोज कचऱ्याची गाडी फिरविण्यात आली तर नागरिकांना कचरा गाडीत टाकता येईल आणि परिसराची स्वच्छता राहील, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
---------
जवाहरनगरातील खेळणी तुटलेली
नागपूर : जवाहरनगर, जुना सुभेदार येथे जवळपास चार खेळण्याची मैदाने आहेत या मैदानाता लहान मुलांना खेळण्यासाठी घसरगुंडी, पाळणे लावण्यात आले आहेत. पण पाळणे नादुरुस्त आहेत आणि घसरगुंडी जागोजागी तुटलेली असल्याने मुलांच्या जीवाला धोका आहे. यासंदर्भात मागणी केल्यावर संत ज्ञानेश्वर उद्यानातील खेळणी दुरुस्त करण्यात आली होती पण जवाहरनगर परिसरातील खेळणी मात्र धोका निर्माण करणारी आहेत. या मैदानात अनेक लहान मुले खेळण्यासाठी येतात. ही खेळणी संबंधित विभागाने दुरुस्त करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
----------------
म. फुले यांना भारतरत्न द्या
नागपूर : महाराष्ट्राचे थोर समाज सुधारक महात्मा ज्योतीराव फुले यांचे महान सामाजिक आणि शैक्षणिक कार्य आहे. त्यांना शासनाने भारतरत्न हा सन्मान देण्याची मागणी भारतीय रिपब्लिकन परिषदेने केली आहे. म. फुले यांनी स्त्री शिक्षणाची दारे उघडी करून मोठी क्रांती या देशात निर्माण केली. अस्पृश्यांच्या शिक्षणासाठी त्यांनी विरोध पत्करून पुण्यात शाळा काढली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न देण्यात आले त्याप्रमाणेच महात्मा फुले यांनाही भारतरत्न सन्मान देण्यात यावा, अशी मागणी परिषदेचे शहराध्यक्ष असंघ रामटेके यांनी केली आहे.