विद्यार्थ्यांचा गौरव (फोटो पॉईंटर)
By admin | Updated: August 26, 2014 21:56 IST
कल्याण- कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या महिला-बालकल्याण समिती तर्फे महापालिका क्षेत्रातील १० वी १२ वीच्या परीक्षेत पहिल्या व दुसर्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा मंगळवारी आचार्य अत्रे नाट्यगृह आयोजित केला होता. सकाळपासूनच जोरदार पाऊस असूनही विद्यार्थी पालक, शिक्षक तसेच महापौर कल्याणी पाटील, महिला बालकल्याण समितीच्या सदस्या, नगरसेविका प्रमिला जाधव, माधुरी वझे, लक्ष्मी बोरकर, सुमित्रा घरत, शर्मिला पंडित, मिनाक्षी डोईफोडे, वंदना गीद, सारिका चव्हाण, मंदा पाटील आदी मंचावर उपस्थित होत्या. यावेळी संदेश पाटील लिखित रंगकलेचा हा महाराष्ट्रातील संगीत, नृत्य, सांस्कृतिचा परिचय करून देणारा कार्यक्रम सादर केला. त्याल विद्यार्थ्यांनी चांगली दाद दिली. आई वडिलांचा आदर करण्याचे आवाहन महापौरांनी यावेळी केले़