Join us  

Stock: ‘निफ्टी’ बनणार का वीस हजारी?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2023 10:07 AM

Stock Market: गत सप्ताहात जागतिक वातावरण चांगले नसले तरी शेअर बाजाराने सर्वच क्षेत्रात चांगली वाढ दाखवली आहे. आगामी सप्ताहात निफ्टी  २० हजार अंशांची पातळी गाठणार का याची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिली आहे.

- प्रसाद गो. जोशीगत सप्ताहात जागतिक वातावरण चांगले नसले तरी शेअर बाजाराने सर्वच क्षेत्रात चांगली वाढ दाखवली आहे. आगामी सप्ताहात निफ्टी  २० हजार अंशांची पातळी गाठणार का याची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिली आहे. याशिवाय जगभरातील विविध घटना घडामोडींवरही बाजाराचे भवितव्य अवलंबून राहाणार आहे. गतसप्ताहात मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक १२११.७५ अंशांनी वाढून ६६,५९८.९१ अंशावर बंद झाला होता. राष्ट्रीय शेअर बाजार निर्देशांक (निफ्टी) १९८१९.९५ अंशावर बंद झाला आहे. मागील सप्ताहात त्यामध्ये ३८४.६५ अंशांनी वाढ झाली आहे. या सप्ताहात विशेष म्हणजे  जागतिक बाजारात अस्थिरता असतानाही सर्वच निर्देशांक वाढीव पातळीवर बंद झाले आहेत.

भारतीय बाजाराचे भांडवल मूल्य विक्रमीभारतीय शेअर बाजारातील संपूर्ण कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल मूल्य ३.८ ट्रिलियन डॉलर्स (३१५.८८ लाख कोटी रुपये) असे विक्रमी पातळीवर पोहोचले आहे. गेल्या काही दिवसात बाजारात आलेल्या जोरदार तेजीमुळे बाजाराचे भांडवलमूल्य मोठ्या प्रमाणात वाढले. मार्च २०२० नंतर भारतीय शेअर बाजाराचे भांडवल मूल्य ३०० टक्क्यांनी वाढले असून, भारतीय बाजार सध्या जगात पाचव्या क्रमांकावर आहे.

...आशिया नको अमेरिकाnगतसप्ताहामध्ये परकीय वित्त संस्थांनी बाजारात मोठ्या प्रमाणावर विक्री केली. अमेरिकेमध्ये बॉण्डच्या व्याजदरात वाढ झाल्याने या संस्था आशियातील पैसे काढून अमेरिकेत गुंतवताना दिसत आहेत. nया संस्थांनी ९३२१.४१ कोटी रुपये शेअर बाजारातून काढून घेतले. त्याच वेळी देशांतर्गत वित्त संस्था मात्र गुंतवणूक करताना दिसून आल्या. या संस्थांनी ४५७२.१४ कोटी रुपयांची बाजारात भर घातली.

तेल दराचे काय?आगामी सप्ताहात देशातील तसेच अमेरिकेतील चलनवाढ, तेलाच्या किमती, अमेरिकेत बॉण्डवर मिळणारे व्याज, भारतातील आर्थिक आकडेवारी आणि परकीय वित्त संस्थांची कामगिरी यावर बाजाराची उलाढाल अवलंबून राहील या सप्ताहात राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) २० हजारांची पातळी गाठणार काय याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागून आहे. 

टॅग्स :शेअर बाजारनिफ्टी