Join us  

शेअर बाजार : थांबा आणि वाट बघाचे अवलंबिले धोरण'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2019 4:26 AM

देशात तसेच जगामध्ये असलेली अस्थिर परिस्थिती, लोकसभा निवडणुकीचे जवळ येत असलेले निकाल, देशी वित्तसंस्थांची खरेदी तर परकीय वित्तसंस्थांची विक्री आणि आगामी सप्ताहामध्ये येणार असलेली विविध आकडेवारी, यामुळे शेअर बाजारामध्ये सप्ताहाच्या अखेरीस घसरण दिसली.

- प्रसाद गो. जोशीदेशात तसेच जगामध्ये असलेली अस्थिर परिस्थिती, लोकसभा निवडणुकीचे जवळ येत असलेले निकाल, देशी वित्तसंस्थांची खरेदी तर परकीय वित्तसंस्थांची विक्री आणि आगामी सप्ताहामध्ये येणार असलेली विविध आकडेवारी, यामुळे शेअर बाजारामध्ये सप्ताहाच्या अखेरीस घसरण दिसली. बाजारात असलेल्या अस्थिर परिस्थितीमुळे गुंतवणूकदारांनी थांबा आणि वाट बघा, असे धोरण स्वीकारलेले दिसून येते.मुंबई शेअर बाजारामध्ये गतसप्ताहामध्ये अस्वलाचा संचार दिसून आला. बाजारात केवळ तीनच दिवस व्यवहार झाले. सप्ताहाचा प्रारंभच निर्देशांक खाली येऊन झाला. त्यानंतर संवेदनशील निर्देशांक ३९,१८९.९५ ते ३८,७५३.४६ अंशांदरम्यान हेलकावत होता. सप्ताहाच्या अखेरीस तो ३८,९६३.२६ अंशांवर बंद झाला. मागील सप्ताहाच्या बंद निर्देशांकाच्या तुलनेत त्यामध्ये १०४.०७ अंश (०.२६ टक्के) घट झालेली दिसून आली.राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) मध्येही सप्ताहात अस्थिरता दिसून आली. सप्ताहाच्या अखेरीस हा निर्देशांक ४२.४० अंशांनी (०.३६ टक्के) कमी होऊन ११,७१२.२५ अंशांवर बंद झाला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप या क्षेत्रीय निर्देशांकांमध्येही घसरण बघावयास मिळाली. मिडकॅप २८०.६४ अंशांनी खाली येऊन १४,७८३.३५ अंशांवर बंद झाला. स्मॉलकॅपमध्ये २६५.२३ अंशांची घट झाली. सप्ताहाच्या अखेरीस तो १४,५४८.१५ अंशांवर बंद झाला आहे.अमेरिका आणि चीन यांच्यामधील व्यापारविषयक बोलणी अंतिम टप्प्यामध्ये आहे. त्यामुळे आंतरराष्टÑीय बाजारांमध्ये नरमाईचे वातावरण होते. त्यातच युरोझोनमध्ये घटलेले उत्पादन बाजाराची चिंता वाढविणारे ठरले. खनिज तेलाच्या किमती काहीशा स्थिरावल्या असल्या तरी त्याबाबतची चिंता कायम आहे.अवघ्या दोन दिवसांमध्ये परकीय वित्तसंस्थांनी भारतीय बाजारातून १२५५ कोटी रुपये काढून घेतले. आगामी सप्ताहात जाहीर होणाऱ्या अर्थव्यवस्थेबाबतच्या आकडेवारीवर बाजार अवलंबून आहे. 

टॅग्स :शेअर बाजार