मुंबई : उत्तर प्रदेशात भाजपाची आलेली लाट शेअर बाजाराला नवी झळाळी देऊन गेली. भाजपाच्या या लाटेमुळे शेअर बाजारातही तेजीची लाट आली आणि निफ्टीने सार्वकालिक विक्रम केला. शिवाय सेन्सेक्स दोन वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला आहे.राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १५२.४५ अंकांनी वाढून ९,0८७ अंकांवर बंद झाला. ३ मार्च २0१५ रोजी निफ्टी ८,९९६.२५ अंकांवर बंद झाला होता. आज निफ्टी प्रथमच ९ हजार अंकांच्या वर बंद झाला आहे. सेन्सेक्स ४९६.४0 अंकांनी अथवा १.७१ टक्क्यांनी वाढून २९,४४२.६३ अंकांवर बंद झाला. ५ मार्च २0१५ रोजी सेन्सेक्स या पातळीवर होता. दिवसभरात एका क्षणी तर सेन्सेक्सने ६१६ अंकांची उसळी घेतली होती. अखेरच्या सत्रात विक्रीच्या माऱ्यामुळे तो खाली आला आणि ४९६.४0 अंकांच्या तेजीसह बंद झाला. महागाई वाढल्याचा परिणाम जाणवला नाहीनेहमी घाऊक आणि किरकोळ महागाईच्या आकडेवारीमुळे चढ-उताराच्या हिंदोळ्यावर राहणारा शेअर बाजार आज मात्र घाऊक महागाई वाढल्याच्या आकडेवारीने बिथरला नाही. महागाई ६.५५ टक्क्यांवर आली असली तरी शेअर बाजारावर त्याचा परिणाम झाला नाही. या कंपन्यांचे शेअर्स सुसाट वेगाने वाढले...आयसीआयसीआय बँकेच्या शेअर्सना मंगळवारी सर्वाधिक मागणी राहिली. बँकेचा शेअर ५.९९ टक्क्यांनी वधारला. यापाठोपाठ हिंदुस्तान युनिलिव्हर, एलअॅण्डटी, एचडीएफसी लिमिटेड, एशियन पेंट्स, मारुती सुझुकी आणि अदानी पोर्ट्स आदी कंपन्यांचीही या तेजीत चलती होती. अमेरिकेच्या आरोग्य नियामकांनी सन फार्माच्या मोहाली येथील प्रकल्पाली मालावरील आयातीचे निर्बंध शिथिल केल्याने कंपनीचे शेअर्स आज वधारले. निवडणूक निकालउत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये भाजपाच्या लाटेमुळे गुंतवणूकदारांचा भारतीय बाजारातील विश्वास वाढला. या विजयामुळे केंद्र सरकारच्या मार्गातील काही अडथळे दूर होऊ शकतात.रोख मर्यादामुक्तबँकांतून पैसे काढण्यावरील मर्यादा हटवण्यात आली आहे. त्यामुळे आता खरेदी वाढेल आणि बाजारात पुन्हा पहिल्यासारखाच पैसा खेळेल अशी आशा आहे. त्याचा फायदा झाला.रुपया वधारलाडॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्ये ११ महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचले आहे. त्यामुळे परकीय गुंतवणूकदार संस्थांना भारतीय गुंतवणुकीतील विश्वास वाढला.
शेअर बाजारातही ‘लाट’!
By admin | Updated: March 15, 2017 00:06 IST