मुंबई : स्टेट बँक ऑफ इंडिया आणि तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळाच्या (ओएनजीसी) शेअर्सचा लिलाव आणि युरोपीय बाजाराच्या सकारात्मक कलामुळे तीन दिवसांपासूनची शेअर बाजारातील घसरण बुधवारी थांबली आणि बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचा सूचकांक 34.क्9 अंकांनी बळकट झाला.
उतार आणि चढावाने भरलेल्या बाजारात सेन्सेक्स खालच्या पायरीवर सुरू झाला आणि एकवेळ तो 27,71क्.क्3 र्पयत पडला. तथापि, दुस:या टप्प्यातील लिलावाच्या समर्थनामुळे सेन्सेक्स सुरुवातीच्या घसरणीतून वर येत 34.क्9 अंकांनी सुधारून 27,831.1क् अंकांवर बंद झाला. गेल्या तीन कामकाजाच्या सत्रंत सेन्सेक्स 765.81 अंकांनी खाली आला होता.
याचप्रमाणो नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टीदेखील 14.95 अंकांनी सुधारून 8,355.65 अंकांवर बंद झाला.
व्यापारी कंपन्यांसाठी सोन्याच्या आयात नियमांत बदल केले जाण्याच्या चर्चामुळे दागिने बनविणा:या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी आली. गीतांजली जेम्स 8.53 टक्के, टीबीङोड 4.46 टक्के, पीसी ज्वेलर्स 2.31 टक्के आणि टायटन 3.99 टक्के मजबूत झाला. दरम्यान, विदेशी गुंतवणूकदारांनी मंगळवारी 221.52 कोटी रुपयांचे शेअर्स विकले.
आशियातील इतर शेअर बाजार संमिश्र राहिला. चीन, हाँगकाँग आणि सिंगापूरचा शेअर सूचकांक चढून बंद झाला. जपान, दक्षिण कोरिया आणि तैवानचा शेअर सूचकांक घसरणीवर बंद झाला. सेन्सेक्समध्ये सहभागी 3क् पैकी 13 कंपन्यांचे शेअर वाढीव किमतीला बंद झाले, तर 17 कंपन्यांच्या शेअरची मात्र घसरण झाली.
वाढ मिळालेल्या शेअर्समध्ये एसबीआय 3.6, ओएनजीसी 2.44, टाटा पॉवर 1.87, टाटा मोटार्स 1.53, सिप्ला 1.48, डॉ. रेड्डीज लॅब 1.37 आणि हीरो मोटोकॉर्प 1.13 टक्के बळकट झाला; परंतु भेल 2.3क्, गेल 2.क्1, एचयूएल 1.79, बजाज ऑटो 1.45 आणि एल अँड टी 1.क्1 टक्के खाली आला. (वृत्तसंस्था)
4एसबीआय, ओएनजीसी, टाटा मोटार्स, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, सिप्ला, हीरो मोटाकॉर्प आणि टाटा पॉवरमध्ये तेजी आल्यामुळे बाजारात उत्साह निर्माण झाला. तथापि, एल अँड टी, आरआयएल, भेलने शेअर्स विकल्यामुळे ही गती थोडी कमी केली.