मुंबई : मध्य-पूर्वेतील भू-राजकीय मुद्यांवरून तणाव वाढल्याच्या पार्श्वभूमीवर देशातील विदेशी गुंतवणुकीला पाय फुटण्याच्या भीतीमुळे मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स गुरुवारी ६५४ अंकांनी कोसळून २८,०००च्या खाली बंद झाला. ही तीन महिन्यांतील सर्वांत मोठी घसरण आहे. याशिवाय राष्ट्रीय शेअर बाजारासह आशियातील इतरही शेअर बाजारातही हाच कल राहिला. मध्य-पूर्वेमुळेच रुपयाची घसरण झाली, तर सोने वधारले.गुरुवारी मासिक वायदे करारांचा चुकारा बुधवारी अमेरिकी बाजारात झालेली घसरण यामुळेही बाजारात विक्रीचा दबाव राहिला. येमेनमध्ये हुती बंडखोरांविरुद्ध सौदी अरेबियाने हवाई हल्ले केल्यानंतर कच्च्या तेलाच्या पुरवठ्याबाबत चिंता निर्माण झाली. परिणामी एकीकडे कच्च्या तेलाची किंमत सहा टक्क्यांनी वधारल्या असताना दुसरीकडे विदेशी चलन विनिमय बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपया कोसळून ६२.७०च्या पातळीवर आला. याच्या परिणामस्वरूप मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सवर विक्री व्यवहाराचा दबाव राहिला आणि अखेरीस ६५४.२५ अंकांनी घसरून तो २७,४५७,५८ अंकांवर बंद झाला. सहा जानेवारीनंतरची ही सर्वांत मोठी घसरण आहे. सहा जानेवारीला सेन्सेक्स ८५४.८५ अंकांनी गडगडला होता. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही १८८.६५ अंकांनी घसरून ८,३४२ अंकावर बंद झाला. आयटी कंपन्यांचे सर्वाधिक नुकसान झाले. इतर आशियाई बाजारातही बहुतांश बाजार घसरणीसह बंद झाले.४नवी दिल्ली : हंगामी मागणी पूर्ण करण्यासाठी सराफा व्यापाऱ्यांकडून खरेदी वाढल्यामुळे सोने-चांदी बाजारात सोन्याचे भाव ४०० रुपयांनी वाढून २६ हजार ९५० रुपये प्रतितोळा एवढे झाले. ४औद्योगिक प्रतिष्ठाने आणि नाणी उत्पादकांकडून मागणी वाढल्यामुळे चांदीचा भावही ९५० रुपयांनी वधारून ३८ हजार ७५० रुपये प्रतिकिलो झाला. सराफा व्यापाऱ्यांनी सोन्याच्या भावातील वाढीचे श्रेय पश्चिम आशियातील उलथापालथीस दिले आहे. या उलथापालथीमुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून लोकांनी सोन्याला पसंती दिल्याने विदेशी बाजारातही सोन्याची चलती राहून त्याचे भाव वाढले, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.४मुंबई : स्थानिक स्टॉक बाजारात गुरुवारी भारतीय रुपया अमेरिकन डॉलरमागे ३४ पैशांनी घसरला. गेल्या दोन आठवड्यांतील ही त्याची सर्वांत मोठी घसरण आहे. ४अमेरिकन डॉलरला महिनाअखेर डॉलरला मागणी वाढल्यामुळे घसरणीनंतर डॉलरमागे रुपयाची किंमत ६२.६७ रुपये झाली.४येमेनमध्ये सौदी अरेबिया हवाई हल्ले करण्याच्या वृत्तानंतर तेलाचा पुरवठा विस्कळीत होण्याची भीती निर्माण झाल्यामुळे क्रूड तेलाचे भाव वधारले. त्याचा परिणाम तेल कंपन्यांसह आयातदारांकडून डॉलरची मागणी वाढली. भारतीय रुपयाची सुरुवात डॉलरमागे ६२.५५ रुपये अशी सुरू झाली. रुपया डॉलरमागे बंद झाला होता तो ६२.३३ वर.
शेअर बाजार, रुपया कोसळला; सोने वधारले
By admin | Updated: March 26, 2015 23:38 IST