Join us  

विक्रीमुळे शेअर बाजार घसरला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2020 3:01 AM

मुंबई शेअर बाजारात बुधवारच्या सत्राची सुरुवात थोड्याशा तेजीने झाली. त्यानंतर बाजार हेकावताना दिसला. मात्र अखेरच्या तासामध्ये झालेल्या मोठ्या विक्रीमुळे संवेदनशील निर्देशांक ३४५.५१ अंशांनी घसरून ३६,३२९.०१ अंशांवर बंद झाला.

मुंबई : जागतिक बाजारामधील निराशाजनक वातावरण आणि दिवसाच्या अखेरच्या सत्रामध्ये बाजारावर आलेल्या विक्रीच्या दडपणामुळे मुंबई शेअर बाजाराची गेल्या पाच सत्रांपासून सुरू असलेली घोडदौड थांबली आहे.मुंबई शेअर बाजारात बुधवारच्या सत्राची सुरुवात थोड्याशा तेजीने झाली. त्यानंतर बाजार हेकावताना दिसला. मात्र अखेरच्या तासामध्ये झालेल्या मोठ्या विक्रीमुळे संवेदनशील निर्देशांक ३४५.५१ अंशांनी घसरून ३६,३२९.०१ अंशांवर बंद झाला. राष्टÑीय शेअर बाजारामध्येही असाच ट्रेंड दिसून आला. येथील निर्देशांक (निफ्टी) ९३.९० अंश म्हणजे ०.८७ टक्क्यांनी खाली येऊन १०,७०५.७५ अंशांवर बंद झाला. मिडकॅप व स्मॉलकॅप या क्षेत्रीय निर्देशांकांमध्येही घट झाली. जगभरात वाढत असलेले कोरोनाचे रुग्ण आणि मृतांची वाढती संख्या यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण असून त्याचा नकारात्मक प्रभाव हा जगभरातील शेअर बाजारांवर पडला आहे. त्यामुळेच युरोप व अमेरिकेतील शेअर बाजारात घसरण झाली. यामुळे भारतातील बाजारही घसरला.

टॅग्स :शेअर बाजारनिर्देशांकव्यवसाय