Join us  

शेअर बाजारातील गुंतवणुकदारांचे १५ लाख कोटींचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2020 3:33 AM

मुंबई शेअर बाजारात गतसप्ताह हा दररोज नवनवीन तळ गाठणारा राहिला. बाजाराला धूलिवंदनची सुटी असल्याने सप्ताहात एक दिवस व्यवहार कमीच झाले. शुक्रवारी तर बाजारात मोठी घसरण होऊन लोअर सर्किट लागले.

- प्रसाद गो. जोशीजागतिक आरोग्य संघटनेने कोरोना ही जागतिक साथ घोषित केल्याचा बाजाराला मोठा फटका बसला असून, गुंतवणूकदारांचे १५ लाख कोटी रुपयांचे भांडवल कमी झाले आहे. निर्देशांकांमध्ये २००८ नंतर प्रथमच मोठी घसरण झाल्याचे बघावयास मिळाले.मुंबई शेअर बाजारात गतसप्ताह हा दररोज नवनवीन तळ गाठणारा राहिला. बाजाराला धूलिवंदनची सुटी असल्याने सप्ताहात एक दिवस व्यवहार कमीच झाले. शुक्रवारी तर बाजारात मोठी घसरण होऊन लोअर सर्किट लागले. त्यानंतर मात्र निर्देशांकाने उसळी घेतली. बाजारात आलेल्या काही सकारात्मक बातम्यांमुळे बाजार वाढला. त्यामुळेच संवेदनशील निर्देशांक पुन्हा ३४ हजारांची, तर निफ्टी ९९०० अंशांची पातळी गाठू शकला.मिडकॅप आणि स्मॉलकॅप या क्षेत्रीय निर्देशांकांमध्येही सप्ताहामध्ये अनुक्रमे ११.१७ आणि ११.७७ टक्के घट झाली आहे. बीएसई ५०० या निर्देशांकामधील ५०० आस्थापनांपैकी ३०० हून अधिक आस्थापनांचे दर घसरलेले दिसून आले. या सप्ताहात झालेल्या तीव्र घसरणीमुळे शेअर बाजारातील भांडवली बाजारमूल्य घटल्याने गुंतवणूकदारांचे १५ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाची साथ जागतिक असल्याची घोषणा केल्यानंतर बाजाराला भीतीने ग्रासले, मात्र अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून पॅकेज जाहीर होण्याची शक्यता आणि भारतामधील चलनवाढीचा घटलेलादर अशा बातम्यांमुळे बाजारकाहीसा वाढला.इंडिया बुल्स मल्टिकॅप फंडइंडिया बुल्स म्युच्युअल फंडाने मध्यम ते दीर्घ मुदतीच्या कालावधीमध्ये भांडवली लाभ देण्यासाठी ही योजना आणली आहे. या योजनेमध्ये जमणारा पैसा हा विविध प्रकारच्या आस्थापनांमध्ये इक्विटी आणि इक्विटीशी संबंधित योजनांमध्ये गुंतविला जाणार आहे. या योजनेमधून कशा प्रकारचा परतावा मिळू शकेल, याबाबत कोणतेही आश्वासन देण्यात आलेले नाही. योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी वा बाहेर पडण्यासाठी कोणताही आकार नाही. ही योजना ओपन एण्डेड असून, ती प्रारंभिक विक्रीनंतर पुन्हा खुली होणार आहे. त्यामुळे आता जे गुंतवणूक करू शकणार नाहीत, त्यांना नंतर संधी मिळेल.सप्ताहातील एनएफओयुनियन मिडकॅप फंडबंद तारीख : १६ मार्च, किमान रक्कम : ५०००निप्पॉन इंडिया फिक्स्डहॉरिझॉन फंडबंद तारीख : १६ मार्च, किमान रक्कम : ५०००आयसीआयसीआय प्रुडे. फिक्स्ड मॅच्युरिटी प्लॅनबंद तारीख : २५ मार्च, किमान रक्कम : ५०००आयसीआयसीआय प्रुडे. फिक्स्ड मॅच्युरिटी प्लॅन ११३४ दिवस प्लॅन एचबंद तारीख : १८ मार्च, किमान रक्कम : ५०००इंडिया बुल्स मल्टिकॅप फंडबंद तारीख : १८ मार्च, किमान रक्कम : ५००निप्पॉन इंडिया कॅपिटल प्रोटेक्शन ओरिएंटेड फंडबंद तारीख : २० मार्च, किमान रक्कम : ५०००एसबीआय कॅपिटल प्रोटेक्शन ओरिएंटेड फंडबंद तारीख : १७ मार्च, किमान रक्कम : ५०००ही केवळ माहिती असून, या योजनांबाबत केलेल्या दाव्यांबाबत ‘लोकमत’ कोणतीही खात्री देत नाही.

टॅग्स :शेअर बाजारनिर्देशांकनिफ्टी