Join us  

शेअर बाजाराच्या निर्देशांकांची वाढ सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2020 1:15 AM

मुंबई शेअर बाजार वाढीव पातळीवर सुरू झाला. संवेदनशील निर्देशांकामध्ये ४६५.८६ अंशांनी वाढ होऊन तो ३६,४८७.२८ अंशांवर बंद झाला.

मुंबई : भारत-चीनदरम्यान कमी झालेला तणाव आणि सकारात्मक असलेले जगभरातील शेअर बाजारांमधील वातावरण यामुळे शेअर बाजार वाढीव पातळीवर बंद झाला.मुंबई शेअर बाजार वाढीव पातळीवर सुरू झाला. संवेदनशील निर्देशांकामध्ये ४६५.८६ अंशांनी वाढ होऊन तो ३६,४८७.२८ अंशांवर बंद झाला. राष्टÑीय शेअर बाजाराच्या निर्देशांकाने (निफ्टी) १.४७ टक्के म्हणजेच १५६.३० अंशांची वाढ नोंदविली. हा निर्देशांक १०,७६३.६५ अंशांवर बंद झाला. दरम्यान रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभागांचे दर वाढल्याने कंपनीच्या बाजार भांडवलमूल्यामध्ये वाढ झाली आहे. आता कंपनीने बाजार भांडवलमूल्य ११.५ लाख कोटी रुपये पार करून गेले आहे. हा टप्पा गाठणारी ही पहिली कंपनी आहे.

टॅग्स :शेअर बाजारव्यवसायअर्थव्यवस्था